जामखेड न्युज——
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे वर गुन्हा दाखल
तीन दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू होते. या आंदोलनाला मनसे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पक्ष यांच्या सह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. कालपासून तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व विद्यार्थी उपोषणाला बसले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारी साठी महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी नियुक्ती केली होती. तरीही विद्यार्थी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलनावर ठाम होते. तेव्हा रात्री उशिरा जामखेड पोलीस स्टेशनला मोरेवर गुन्हा दाखल झाला आहे.
आंदोलन कर्त्याशी चर्चा करण्यासाठी काल उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे यांनी भेट दिली व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या. तसेच मुलींच्या तक्रारी साठी महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी नियुक्ती केली होती. तरीही विद्यार्थी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाम होते तेव्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या एका विद्यार्थीनीने भास्कर मोरे विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, भास्कर मोरे पाटील यांनी फिर्यादी यास कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलावून घेऊन सदर ऑफिसच्या अँटी चेंबर मध्ये फिर्यादीस लज्जा उपत्न होईल असे कृत्ये करतात. अश्लिल चाळे करतात. अशी फिर्याद एका काॅलेजच्या विद्यार्थिनीने दिली आहे. यानुसार जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.
या आगोदरही रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. आताही परत गुन्हा दाखल झाला आहे.
रात्री उशिरा पर्यंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुका अध्यक्ष पांडुराजे भोसले, रमेश (दादा) आजबे, सुनील साळवे, मनसेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, हवा सरनोबत, सनी सदाफुले, आण्णासाहेब सावंत, पवनराजे राळेभात, प्रहारचे जयसिंग उगले, महेश निमोणकर, गणेश हगवणे, सचिन देशमुख, अवदुत पवार, नाना खंडागळे, आकाश घागरे, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ म्हेञे, गणेश मासाळ, गणेश जोशी, स्वप्निल खाडे, विजय राळेभात, विकास मासाळ, बाळासाहेब ढाळे, रोहित चव्हाण, आम आदमीचे संतोष नवलाखा, अनिल पाटील यांच्या सह रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आज चौथ्या दिवशी काही मुलींची प्रकृती खालावली यामुळे ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.