जामखेड न्युज——
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका आयोजित भव्य किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण उत्साहात संपन्न
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका आयोजित तालुकास्तरीय भव्य किल्ले बांधणी स्पर्धा आयोजन केले होते या किल्ले स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा शनि मारुती मंदिर या ठिकाणी उत्साह संपन्न झाले.
प्रथम क्रमांक श्रेयश सुदाम वराट, द्वितीय औदुंबर बिडकर, तृतीय अंकिता जाधव, चौथा विक्रांत वाटाडे, पाचवा आदिती उबाळे, सहावा अर्जुन चौधरी या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रथम क्रमांक श्रेयस वराट व त्याचे सहकारी अथर्व क्षिरसागर, वेदांत निंबाळकर यांनी किल्ले प्रतापगड प्रतिकृती बनवली होती यास प्रथम क्रमांक मिळाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर ,अँड पी. के. कात्रजकर, अँड प्रसाद गोले, रवींद्र शिंदे, निलेश भोसले, समर्थ हाॅस्पिटलचे भारत दारकुंडे, भरत लहाने, योगेश शेटे, बाबा खराडे, नाना खंडागळे, बाळासाहेब ढाळे, भाउ पोटफोडे, जगु म्हेत्रे, उत्कृष कुलकर्णी, बंटी पाटील, पंडीत आप्पा, सचिन देशमुख, रितेश जाधव , व सर्व शिवभक्त धारकरी उपस्थित होते.
यावेळी पांडुरंग भोसले यांनी मनोगत मध्ये किल्ले स्पर्धाचा उद्देश नवीन पिढी मोबाईल टीव्ही पासून दूर राहून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराची प्रेरणा घेण्यासाठी किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते तसेच प्रत्यक्ष किल्ला बांधून इतिहास ची जाणीव केली जाते. व देशभक्त पिढी घडवण्यासाठी किल्ले बांधणीचा उपयोग होतो.
सभापती डाॅ भगवान मुरूमकर यांनी मनोगत मध्ये पांडुराजे भोसले यांचे कार्य निस्वार्थी आहे. शिवराज्याभिषेक व श्री शिवप्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी अनोखी उपक्रम घेतात गोरक्षण गोशाळा तसेच सामाजिक कार्य सतत चालुच असते आणि असे निष्कलंक व्यक्तिमत्व समाजासाठी कार्य करत आहे ही गौरवाची बाब आहे असे मनोगत व्यक्त केले.
शेवटी शिवप्रतिष्ठांच्या वतीने गड कोट मोहिमेचा भंडारा करण्यात आला यावेळी सर्व शिवप्रेमींनी महाप्रसादाचा लाभ घेतला.