जामखेड न्युज——
जामखेड शहरात प्रथमच प्रजासत्ताक दिनापासून जामखेड प्रिमियर लिगचे आयोजन आठ टिमचा सहभाग, सहा षटकांचा सामना
जामखेड शहरात प्रथमच आयपीएल क्रिकेट प्रमाणे जामखेड प्रिमियम लिगचे आयोजन चार संयोजकांनी युनिव्हर्सल स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या प्रिमियम लीग मध्ये आठ टिम चालक असून त्यांनी आपआपले संघ मैदानात उतरवले आहे. २६ जाने. प्रजासत्ताक दिनी सकाळी दहा वाजता काझी मैदानावर क्रिकेटचा थरार पाच दिवस रंगणार आहे. क्रिकेट प्रेमीसाठी जामखेड प्रिमियम लीग एक मेजवानी ठरणार आहे.
युनिव्हर्सल स्पोर्ट जामखेड अयोजीत जामखेड प्रिमियर लिगची संकल्पना अजित घायतडक, अमिर काझी, कपिल राऊत, सुरज निमोणकर यांनी प्रत्यक्षात आणली. प्रिमियम लीग साठी जामखेड शहर व तालुक्यातून ५०० खेळाडूंनी फॉर्म भरले होते त्यापैकी १०४ खेळाडू निवडण्यात आले. दि. १४ रोजी विविध टिमच्या आठ मालकांनी आपापल्या संघासाठी १३ खेळाडू या १०४ खेळाडूमधून बोली लावून निवडले आहेत. प्रत्येक संघ सहा सामने खेळणार असून सहा षटकाचा सामना असेल.
जामखेड प्रिमियम लीगचे २६ जाने. प्रजासत्ताकदिनी जामखेड सेंट्रल कॉम्प्लेक्स मधून जामखेड प्रिमियर लीग सहभागी खेळाडूंची बाईक रॅली सकाळी नऊच्या सुमारास डि जे. लावून मिरवणूक निघणार आहे व दहा वाजता काझी मैदानात पोहचणार आहे. आ. रोहीत पवार व आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत जामखेड प्रिमियम लीगचे उद्घाटन होईल व सकाळी अकरा वाजता पहिली मॅच खेळवली जाणार आहे.
जामखेड प्रिमियम लीग संघातील आठ संघचालक व त्यांची टिम पुढील प्रमाणे श्री लखन भुतकर यांची रायझिंग स्टार, श्री विष्णू चव्हाण यांची सावकार इलेव्हन, श्री नानासाहेब बाबर मेजर यांची एच अॅण्ड आर किंग्ज इलेव्हन, श्री अबरार सय्यद यांची जनता क्लब, श्री दिपक गोरे यांची जाणता राजा क्रिकेट क्लब, श्री आण्णा मोरे यांची ए आर वॉरियर्स, युनिटी हॉस्पिटल यांची ए. के. सुपरकिंग, सोनु इनामदार यांची न्यु फ्रेंड क्रिकेट क्लब असे संघ आहेत.
वरील आठ संघ चालक व प्रिमियम लीगचे चार संयोजक यांनी जामखेड प्रिमियम लीग आयपीएल प्रमाणे करून विजेत्या संघासाठी २१ हजार व उपविजेत्या संघासाठी ११ हजार बक्षिस ठेवले आहे.