Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या साकत घाटात ऊसाचा ट्रक पलटी, एक जखमी

साकत घाटात ऊसाचा ट्रक पलटी, एक जखमी

0
1179

जामखेड न्युज——

साकत घाटात ऊसाचा ट्रक पलटी, एक जखमी

अरूंद घाट, मोठे चढ यामुळे साकत घाटात नेहमीच अपघात होत आहेत. घाटाचे चढ कमी करून घाट रूंद करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

सध्या जामखेड पंचदेवालय ते सौताडा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता खोदलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक साकत मार्गे सुरू आहे. पण अरुंद घामामुळे अवजड वाहनांना मोठी अडचण निर्माण होते.

जागतिक बँकेकडून करमाळा ते पाटोदा साकत मार्गे रस्ता सर्व्हे झाला आहे. लवकरात लवकर हा रस्ता सुरू व्हावा म्हणजे रूंद रस्ता व घाटाचे वळणे कमी करून चढ उतार कमी होतील. त्यामुळे लवकर रस्ता सुरू व्हावा अशी मागणी होत आहे.

साकत जवळील महासांगवी येथील उसाचा ट्रक क्रमांक एम. एच. २३ डब्ल्यू 0725 हा करमाळा येथील कारखाना कमलाई येथे चालला होता. घाटात अचानक गाडीत बिघाड निर्माण झाल्याने उताराला ट्रक पलटी झाला सर्व ऊस खाली पडला यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.

साकत घाटात नेहमीच लहान मोठे अपघात होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर घाटाचे वळणे कमी करून रस्ता रूंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. म्हणजे अपघात कमी होतील. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!