जामखेडच्या पत्रकारांच्या लेखणीचा जिल्ह्यात दबदबा – संचालक अमोल राळेभात पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

0
354

जामखेड न्युज——

जामखेडच्या पत्रकारांच्या लेखणीचा जिल्ह्यात दबदबा – संचालक अमोल राळेभात

पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

जामखेडच्या पत्रकारांच्या लेखणीचा जिल्ह्यात मोठा दबदबा आहे. हाच दबदबा टिकवून ठेवावा तसेच पत्रकारांनी पत्रकारितेबरोबर इतर व्यवसाय, धंदा करून आपली आर्थिक उन्नती करावी असे मत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, गजानन शिंदे, गणेश चव्हाण, पृथ्वीराज वाळुंजकर, अशोक घुमरे, यावेळी पत्रकार वसंत सानप, अशोक निमोणकर, नासीर पठाण, सुदाम वराट, अविनाश बोधले, मोहिद्दीन तांबोळी, संजय वारभोग, निलेश वनारसे, बाळासाहेब वराट, किरण रेडे, अशोक वीर, लियाकत शेख, पप्पूभाई सय्यद, अजय अवसरे, प्रकाश दळवी, समीर शेख, प्रकाश खंडागळे, यासीन शेख, धनराज पवार, रिझवान शेख, संतराम सुळ यांच्या सह सर्व पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमोल राळेभात म्हणाले की जामखेड मधील पत्रकारांनी तात्यांवर जसे प्रेम केले तसेच प्रेम आम्हा भावंडांवरही करावे

यावेळी सुधीर राळेभात म्हणाले की, सर्वाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही राळेभात बंधू नेहमीच प्रयत्नशील राहू असे सांगितले. 

यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट म्हणाले की, जामखेड मधील पत्रकार समाजाला न्याय देण्याचा खरोखरच करत आहेत. तात्यांच्या विचारांचा वारसा राळेभात बंधूच्या सहकार्याने आम्ही प्रभावीपणे राबविणार आहोत. यावेळी त्यांनी जुने पत्रकार व नवे पत्रकार फरक तसेच पत्रकारांच्या अडीअडचणी वर भाष्य केले.


यावेळी अविनाश बोधले, किरण रेडे, संजय वारभोग, प्रकाश खंडागळे, यासीन शेख, मोहिद्दीन तांबोळी, वसंत सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लियाकत शेख यांनी केले.

 

चौकट
पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी राळेभात कुटुंबातील शिवाजी राळेभात यांचा रसायनशास्त्र विषयातील प्रबंध (पीएचडी) प्रसिद्ध झाला याबद्दल सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here