जामखेड न्युज——
प्रयत्न व सातत्य हाच यशाचा मंत्र – डॉ. तात्याराव लहाने
संकटातून काहीतरी शिकता येते – शशिकांत गाडेकर
जामखेड कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्याने संपन्न
मुलांनो कधी कोणतीही गोष्ट छोटी समजू नका. छोट्या छोट्या गोष्टी करत रहाल तर नक्कीच उद्याचे यशस्वी नागरिक व्हाल. त्यामुळे भय आणि चिंता सोडून द्या, प्रयत्न करत रहा, पण आपल्या मध्ये सातत्य ठेवा. आपल्या मध्ये सातत्य राहिले तर आपण यशाच्या शिखरवर नक्कीच पोहचणार, आताच ठरवा मला काय व्हायचंय आणि कसं होणार आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करा कोणतही ध्येय अवघड नाही, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा खूप आहे परंतु आपल्याला ज्यामध्ये करिअर करायचे आहे त्यासाठी तुमचा सर्वात जास्त बेस्ट दया मंग तुम्हला कोणीही तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही अशा मार्मिक शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले.
कालिका पोदार स्कुल येथे विध्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये वेगवेगळे सन, उत्सव, महापुरुषांची जयंती, स्पोर्ट डे, गॅदरिंग असे अनेक उत्सव साजरे केले जातात तसेच वेगवेगळे प्रेरणादायी व्याख्याने दहावी नंतर काय करायचं, करिअर विषयी मार्गदर्शन याविषयी चे व्याख्याने ठेवली जातात.
यातच आज इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाच एका प्रेरणादायी व्याख्यांनांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इयत्ता नववीच्या मुलींनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.व मान्यवरांचे स्वागत शाळेचे संस्थापक सागर अंदुरे, निलेश तवटे तसेच मुख्याध्यापक मा. श्री प्रशांत जोशी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून मा.डॉ.श्री तात्याराव लहाने.(Eye Surgeon & Opthalmologist JJ Hospital Mumbai ) मा. श्री शशिकांत गाडेकर(PSI),मा.संदिप काळे (B.ARCH,Pune University) हे लाभले होते.
यावेळी मा.शशिकांत गाडेकर यांच्या व्याख्यानाचा विषय- ‘संकट हे काहीतरी शिकण्यासाठी येत आसते’ या विषयावर बोलताना ते म्हणाले अनेक संकटांवर मात करत आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहचले पाहिजे, आपल्यामध्ये प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकत आणि ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येक संकट हे काहीतरी सांगून जात असते आणि शिकवून जात असते परंतु आपलं ध्येय आपण आपल्या डोळ्यासमोर ठेऊन ते गाठायच आहे हा निश्चय केलं पाहिजे मला ही खूप संकटे आली परंतु माझं ध्येय ठरलं होत psi होईपर्यंत मी थांबलो नाही आणि अजूनही थांबणार नाही मी माझा अभ्यास चालू ठेवला अनेक पुस्तके वाचली अजूनही वाचतं आहे आपली स्पर्धा कोणासोबत आहे तर ती स्वतः सोबत आहे तेव्हा संकटावर मात करा आणि भविष्य घडवा.असे मत व्यक्त करत ऊर्जा देणार मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यानंतर डॉक्टर तात्याराव लहाने (विश्वविख्यात डोळ्यांचे डॉक्टर)
गिनीज बुकाने सुद्धा त्यांची नोंद घेतली असे डॉक्टर,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कालिका पोदार लर्न स्कुल येथे लाभले होते ते जगभरामध्ये सर्वाधिक यशस्वीरित्या ऑपरेशन करणारे म्हणून त्यांची देशात ओळख आहे असे डॉक्टर लहाने, यांनी व्हिडिओद्वारे मुलांना मार्गदर्शन केले.
यानंतर मा.संदिप काळे मार्गदर्शन करताना म्हणाले मी गरीब परिस्थिती मधुन माझे शिक्षण पुर्ण केले .संकटावर स्वार होऊन धेयाशी लढत राहिलो .आपण आपल्या प्रयत्नाशी प्रामाणिक असले म्हणजे ईश्वर सुद्धा आपल्याला सहाय्य करतो व मदतीला धावून येत असतो. या सर्व गोष्टी आपण अनुभवातून शिकत असतो मीही शिकलो आहे .कधी शिक्षकांनी शिकवले तर कधी संकटांनी. आपल्या इच्छाशक्तीलाच आपण शस्त्र बनवा आणि झुंज देत रहा .शेवटी विजय हा प्रयत्नांचा होतो . प्रयत्न आणि सातत्य टिकवलं तर यश नेहमीच तुमच्या पायाशी लोटांगण घालीन अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी दहावीच्या मुलांनी व्याख्यात्यांचे संचालक मंडळाचे आभार मानले