जामखेड न्युज——
जामखेडमध्ये आपला दवाखाना वाऱ्यावर
दवाखान्यात डॉक्टरच नसल्याने रुग्णांचे हाल

जामखेड शहरात शासनाच्या वतीने सार्वजनिक अरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करून हिंदुद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठीकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने सध्या तरी हा दवाखाना वाऱ्यावर तसेच सलाईनवर आहे. परीणामी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. अपंग रूग्ण दिवसभर थांबूनही उपचार मिळाले नाहीत.

ग्रामीण तसेच शहरीभागातील गोरगरीब रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना आम्लात आली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 700 दवाखाने सुरू केले जाणार आहेत.

त्याठिकाणी प्राथमिक मोफत उपचार मिळत आसल्याने त्याचा लाभ रूग्णांना मिळु लागला परंतु या दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी रुग्ण करत आहेत कारण हा दवाखाना दुपारी दोन वाजता सुरू होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना त्याची सेवा मिळत नाही आसच प्रकार आज सकाळी पहावयास मिळाला. सध्या तर डॉक्टर नसल्याने दवाखाना बेवारस आहे.
जामखेड शहरातील एका दिव्यांग बांधवाला उपचारासाठी प्रहारचे तालुका अध्यक्ष नय्युमभाई शेख हे आपला दवाखाना या ठिकाणी घेऊन गेले आसता त्याठिकाणी कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हते दुरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला आसता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने दिव्यांग बांधव शेख यांनी ठिकाणी बोलताना तिव्र नाराजी व्यक्त केली एक तर दिव्यांगांना उपचार घेण्यासाठी दुसऱ्यांवर आवलंबुन राहावे लागते कसंबसं कोणाच्यातरी मदतीने याठिकाणी गेले तर उपचारासाठी डॉक्टर नाही त्यामुळे यावर मार्ग काढावा.

यावेळी बोलताना शेख म्हणाले की शासनाने आपला दवाखाना म्हणून गाजावाजा करत फक्त बोर्ड लावले जाहिरातीसाठी मोठा खर्च केला. परंतु प्रत्यक्षात येथे कसलीही सुविधा सद्या स्थितीत मिळत नाही त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष्य घालुन ताबडतोब रूग्णसेवा सुरळीत करावी आन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
शासन म्हणते आपला दवाखाना मध्ये पुढील प्रमाणे सुविधा मिळतील
या योजनेअंतर्गत साधारणपणे 25 हजार ते 30 हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखाना सुरू करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे.
सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील.
आपला दवाखाना अंतर्गत 147 प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतील अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
काही ठिकाणी पोर्ट केबिनमध्ये प्राथमिक उपचारासाठी दवाखाना सुरू केला जाणार आहे.
तसंच पॉलिक्लिनिकमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळेल असंही पालिकेचं म्हणणं आहे.
महानगरपालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, इत्यादी चाचण्या केल्या जातील.
या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटीपद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे. या जागांच्या भरतीसाठी जाहिराती द्वारे भरती केली जाते.
कान नाक घसा तज्ज्ञ (ENT) नेत्रचिकिस्ता, स्त्री रोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ज्ञ अशा आरोग्य सुविधा पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागात प्रामुख्याने एसटी स्थानकाजवळ ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे.
परंतु जामखेड मध्ये दवाखाना आहे पण डॉक्टर नसल्याने दवाखाना वाऱ्यावर आहे.
चौकट
जामखेड येथे सुरु असलेल्या आपला दवाखाना या ठिकाणी पहील्या डॉक्टरांनी राजीनामा दिला आसल्याने गेल्या आनेक दिवसापासून या ठीकाणी नविन डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यासाठी वरीष्ठ कार्यालयाकडे डॉक्टर मिळावेत यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच या दवाखान्याची वेळ ही २ ते रात्री १० वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सकाळी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे आशी माहिती आरोग्य विभागाकडुन मिळाली आहे.





