ड्रायव्हर संरक्षण कायदा करावा – जामखेड परिवहन ड्रायव्हर असोशिएशन

0
199

जामखेड न्युज——

ड्रायव्हर संरक्षण कायदा करावा – जामखेड परिवहन ड्रायव्हर असोशिएशन

 


केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतांना पाहायला मिळत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी ट्रकचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे. याच अनुशंगाने जामखेड मध्ये देखील परिवहन ड्रायव्हर असोशिएशन जामखेड व चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदन देऊन केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे.


दरम्यान याच कायद्याला सर्व स्तरातून विरोध होत असून, ट्रकचालक थेट रस्त्यावर उतरले आहेत. याच अनुषंगाने जामखेड मध्ये देखील परिवहन ड्रायव्हर असोशिएशन जामखेडच्या वतीने देखील तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध केला.


तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परिवहन ड्रायव्हर्स असोसिएशन ऑल इंडिया च्या वतीने मागणी केलेल्या मारहाणीत म्हंटले आहे की केंद्र सरकारने जो वाहन चालकाविरोधी कायदा आमलात आणण्याच्या निर्णय घेतला तो ड्रायव्हर विरोधी असुन तो रद्द करण्यात यावा.


तसेच अपघात समयी वाहन चालकास पब्लीक कडुन होणारी विनाकरण मारहाण थांबविण्यासाठी वाहन चालक संरक्षण कायदा पारित करावा. जो पर्यंत वाहन चालक सरंक्षण कायदा पारित केला जात नाही तोपर्यंत आम्ही वाहने चालवणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी आसे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देता वेळी जामखेड येथील परिवहन असोशिएशन व चालक मालक संघटना जामखेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here