श्रीदत्त जन्म सोहळयानिमित्त हाळगाव येथील तिर्थक्षेत्र सिध्देश्वर दत्त संस्थानामध्ये अखंड हरिनाम सोहळा संपन्न.

0
331

जामखेड न्युज——

श्रीदत्त जन्म सोहळयानिमित्त हाळगाव येथील तिर्थक्षेत्र सिध्देश्वर दत्त संस्थानामध्ये अखंड हरिनाम सोहळा संपन्न.

जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध अशा दत्त देवस्थान हाळगाव येथे सिध्देश्वर दत्त संस्थानचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताहात काल्याचे किर्तन बापुसाहेब महाराज ढगे यांचे झाले.यावेळी त्यांनी मनूष्य जन्म पुन्हा नाही. हरीनाम घेवुन मनुष्यजन्माचे सार्थक करा असे आवाहन वेदांताचार्य ढगे यांनी केले आहे.

श्री दत्त जयंतीनिमित्त तालुक्यातील हाळगाव येथील तिर्थक्षेत्र सिध्देश्वर दत्त संस्थानामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सिध्देश्वर दत्त संस्थानचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताहात काल्याचे किर्तन बापुसाहेब महाराज ढगे यांचे झाले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी वेदांताचार्य ढगे म्हणाले, धन दौलत तुमच्याबरोबर येणार नाही.तुम्ही केलेले सत्कर्मच तुमच्याबरोबर येणार आहे. संताची संगत सन्मार्गाला लावते. आपली मुले संताच्या संगतीत ठेवली तर सदविचाराने वागतील आणि आई वडीलांना वृध्दाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणसाने आचार, विचार, उच्चार याची दक्षता घेतली तर कुठलेही संकट येवु शकत नाही.असे आवाहन त्यांनी केले.

रामायणाचार्य बाबा महाराज ढवळे यांच्या प्रेरणेने झालेल्या या सप्ताहात निरा-नरसिंहपुर अंकुश महाराज रणखांबे व्यासपीठ चालक म्हणून काम पाहिले, त्यांचे सात दिवस संतचरित्र झाले.

अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दरम्यान पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, संतचरित्र, हरिपाठ,हरिकिर्तन व नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम झाला. या सप्ताहात भरत महाराज औटी, गणेश महाराज धुमाळ, माऊली महाराज म्हस्के, दिनानाथ महाराज सावंत, सुनील महाराज झांबरे, सुखदेव महाराज ननवरे, गहिनीनाथ महाराज खेडकर यांची किर्तनसेवा दिली. तर दत्त जन्म सोहळयानिमित्त मंगळवारी (ता.२६) सायंकाळी अंकुश महाराज रणखांबे यांचे किर्तन झाले.

या सप्ताहात कोर्टी (ता.करमाळा) येथील श्री संत हरि हरि बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारक-यांनी हरिपाठ आणि किर्तनासाठी साथ संगत केली.

 

विनोदाचार्य ‘ ही पदवी किर्तनकाराला शोभत नाही.

वेदांताचार्य बापुसाहेब ढगे म्हणाले,
प्रत्येक किर्तनकाराने वारक-याचे नियम पाळुन नियमबाह्य किर्तन करू नये. संताच्या अभंगावरच किर्तन करावे. ‘ विनोदाचार्य ‘ ही पदवी किर्तनकाराला शोभत नाही. किर्तनामध्ये विनोद कमी असावा आणि ज्ञानदान जास्त असावे. आपल्या किर्तनाच्या प्रबोधनातून समाजमनावर चांगला परिणाम होईल असे प्रबोधन करावे.असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here