जामखेड न्युज——
जामखेड शहरात लाखो रुपयांच्या गुटख्यासह दोन जण ताब्यात
जामखेड शहरातील नुराणी कॉलनी येथे एका घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली यानुसार छापा टाकून दोन लाख ७८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले आहे. यामुळे परिसरातील गुटखा विक्रेते यांच्यात एकच खळबळ उडाली आहे.
जामखेड शहरातील नुराणी कॉलनी येथे एकाने घरात गुटख्याचा साठा विक्रीसाठी आणला असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात सुंगधी तंबाखू व गुटखा बाळगणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
जामखेडमधील नुराणी कॉलनी येथे गुटख्याचा एकाने घरात विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. २ लाख ७८ हजारांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पथक जामखेड परिसरात अवैध धंद्यांवर धाडी टाकण्यासाठी गस्त घालत असताना प्रतिबंधीत गुटख्याची घरातून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नुराणी कॉलनीत पठाण याच्या घरात छापा टाकला.
घरातून पानमसाला, तंबाखू व मोटारसायकल असा एक लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस शिपाई रोहित मिसाळ यांच्या तक्रारीवरून तौकीर मुश्ताक पठाण (वय २३, रा. नुराणी कॉलनी, जामखेड, जि. अहमदनगर, अमित अनिल भोसले (वय २४, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, जि. अहमदनगर) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, रोहित मिसाळ, रणजित जाधव, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.