जामखेड न्युज——
पै. सुजय नागनाथ तनपुरेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत पै. सुजय नागनाथ तनपुरे प्रथम क्रमांक मिळवून गोंडा उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
पै. सुजय तनपुरे याने गेल्या वर्षी अमान येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत पंधरा वर्षे वयोगटाखाली सुवर्ण पदक पटकावले होते. अमान येथील 15 वर्षाखालील वयोगटात कुस्ती स्पर्धेत पै. सुजय तनपुरेने सुवर्ण पदक जिंकले होते. त्याने शिऊरचे व जामखेडचे नाव आता जगात पोहोचवले आहे.
सुजय तनपुरेने मागील वर्षी पार पडलेल्या
सोनीपत येथील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत शिऊर गावाचा सुपुत्र पै.सुजय नागनाथ तनपुरे याची 68 kg वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून जॉर्डन देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती.
सुजय हा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज येथे पंकज हरपुडे व महेश मोहळ यांच्या मार्गदरशनाखाली सराव करतो. सुजयने दिल्ली,हरियाणा पंजाब अशा राज्यांच्या मल्लांवरती विजय मिळवत होता व महाराष्ट्राला सुवर्ण पदकाची कमाई करून दिली. सुजयने आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.