विद्यार्थी प्रिय शिक्षक चंद्रहास हुंबे (आण्णा) यांचा जामखेड करांच्या वतीने अमृत महोत्सव उत्साहात साजरा

0
1466

जामखेड न्युज——

विद्यार्थी प्रिय शिक्षक चंद्रहास हुंबे (आण्णा) यांचा जामखेड करांच्या वतीने अमृत महोत्सव उत्साहात साजरा

 

जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयात ज्युनियर काॅलेज सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे व गणित विषयाचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक चंद्रहास हुंबे (आण्णा) यांचा अमृत महोत्सव जामखेड करांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी आखिल भारतीय वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, प्रा. मधुकर राळेभात, ऋषिकेश हुंबे, दत्तात्रय हुंबे, भरत हुंबे, भगीरथ हुंबे, डॉक्टर कालिदास निरस, डॉक्टर अर्चना निरस, प्रा. कारभारी निरस, श्रीमती अक्षरा सांगडे, उत्तम सांगडे, अभिजित सोळुंके, नगरसेवक अमित चिंतामणी, माजी प्राचार्य ज्ञानदेव कुंभार, सोपाल सर, शिवानंद हलकुडे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, रमेश अडसुळ, अँड.  प्रविण सानप,  ढगे सर, शहाजी वायकर सर, पी. टी गायकवाड, आंबेकर भाऊसाहेब, भरत लहाने, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, संतोष देशमुख, राऊत तसेच अनेक शिक्षक व उच्च पदस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जामखेड करांच्या वतीने चंद्रहास हुंबे (आण्णा) यांचा खर्डा रोडवरील केशर हाँल येथे अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी १२ ते १ अभिष्टचिंतन, १ ते २ प्रीती भोजन २ ते ३ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सपत्नीक हुंबे परिवाराचा सत्कार करण्यात आला व अमृत महोत्सव साजरा केला तसाच शतक महोत्सव साजरा करण्याची संधी मिळावी म्हणून सर्वानी शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना चंद्रहास हुंबे (आण्णा) म्हणाले की, जामखेड करांनी हुंबे कुटुंबियांवर मनापासून प्रेम केले इमानेइतबारे सेवा केली यामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ आहेत. अनेक परदेशात चांगल्या पदावर आहेत. ते म्हणाले की, ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेज १८ विद्यार्थ्यांवर सुरू केले आज याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. सर्वाशी मिळूनमिसळून राहिलो यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठा चाहता वर्ग आहे.

तसेच यावेळी स्वर्गीय मोरेश्वर देशमुख (नाना पाटील ), शेटे सर, विनोद पाटील यांची प्रकर्षाने आठवण काढली यांनी नोकरीच्या काळात खुप सहकार्य केले असे सांगितले.

मी जामखेड मध्ये सर्वाशी मिळूनमिसळून राहिलो यामुळे चाहतावर्ग खुप मोठा आहे. मी मित्र कंपनीत कधीही पैशाचा व्यवहार केला नाही. यामुळे आजही मैत्री कायम आहे. जामखेडकरांनी हुंबे कुटुंबियांवर खुप प्रेम केले आहे. आजचा कार्यक्रम पाहुन मी खुपच भारावून गेलो आहे. हा प्रेमाचा सोहळा आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here