जामखेड तालुका संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

0
214

जामखेड न्युज——

जामखेड तालुका संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

 

आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकावरील आर्थिक व मानसिक अन्यायाविरुद्ध तसेच संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज शुक्रवार दि 4 रोजी जामखेड तालुका परिचालक संघटनेच्या वतीने जामखेड पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

शासन संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामी राज्यातील सर्व संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात भरीस भर म्हणून कंपनीने अतिरिक्त टार्गेट दिले. परंतु, त्या टार्गेटच्या नावावर बोगस कामे वाढू शकतात व सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे कंपनीने टार्गेट पद्धत बंद करावी, संगणक परिचालकांवर अतिरिक्त कामांचा भार लादू नये, सर्व संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्‍चित तारखेस देण्यात यावे, आकृतीबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक 20 हजार रुपये वेतन देण्यात यावे, नियमबाह्य कामे लावताना त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा, computer operators दिवाळी पूर्वी मागील दोन महिन्यांचे प्रलंबित मानधन तत्काळ देण्यात यावे, या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

याच बरोबर यावलकर समितीने ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृती बंधाबाबत शासनास ३१ मे २०१८ साली अहवाल सादर केला आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी देखील दि २८ रोजी डीसेंबर २०२२ रोजी लेखी आश्वासन दिले होते. शासनाने यावलकर समितीच्या शिफारशीनुसार डेटा एंन्ट्री ऑपरेटर /संगणक परिचालक या पदाची कायमस्वरूपी निर्मिती करुन करावयास व किमान वेतन देण्यास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दि ११ जानेवारी २०२३ रोजीच्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दि १ मार्च २०२३ रोजी बैठक संपन्न झाली होती मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. 

असे देखील जामखेड तालुका संगणक परिचालक संघटनेचे सचिव रविंद्र कोळपकर यांनी धरणे आंदोलना दरम्यान व्यक्त केले.

यावेळी धरणे आंदोलनस्थळी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या व भावना जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या सर्व मागण्या शासन स्तरावर पोहोचवणार आसुन त्याचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. या आंदोलनात जामखेड तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष संदिप जायभाय, सचिव रविंद्र कोळपकर, उपाध्यक्ष नानासाहेब शेळके, प्रसाद नन्नवरे, विजु काळे, संदिप तुपेरे, बाळासाहेब गोपाळघरे, विजय लांडे, ज्ञानेश्वर सुतार, ऋषिकेश वराट, दिपक ढवळे, युवराज भोरे, प्रदिप गायकवाड, शशी कोळपकर, नाना सावंत, अमोल मगर, हनुमंत उदमले, ऋषिकेश उगले, व निलम उगले सह जामखेड तालुक्यातील संगणक परिचालक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here