जामखेड शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात स्वच्छ जामखेड सुंदर जामखेडचा बोजवारा

0
418

जामखेड न्युज——

जामखेड शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

स्वच्छ जामखेड सुंदर जामखेडचा बोजवारा

जामखेड शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग असून साफसफाई नियमित होत नाही. घंटागाडी चार चार दिवस येत नसल्याने नागरिकांना कचरा कोठे टाकावा त्यातच नवरात्र उत्सव आल्याने घरोघरी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. त्यामुळे कचरा कोठे टाकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता आठ घंटागाडी व तीन टॅक्ट्रर नगरपरिषदेच्या मालकीचे आहेत ते सर्व वाहने ठेकेदाराला अल्प भाडेतत्त्वावर दिले आहेत. एकही वाहन ठेकेदाराचे नसतात त्याला मात्र मासिक अठरा लाख रूपये दिले जात आहे. मागील तीन वर्षांपासून नगरपरिषदेकडे एकच ठेकेदार असल्याने मनमानी चालू आहे. नगरपरिषदेने तीन नवीन घंटागाडी दोन महिन्यापूर्वी आणल्या आहेत परंतु पासिंगअभावी त्या जामखेड पोलीस स्टेशनच्या आवारात धुळखात पडून आहेत.

शहरात अनेक ठिकाणी कचऱ्यांचे मोठ मोठे ढिग आहेत मुख्य इमारती शेजारी मोठ मोठे कचऱ्यांचे ढिग आहेत. शासकीय इमारती शेजारी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे.

जामखेड नगरपरिषदेचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता नागरिकांना चांगल्या सुविधा देण्या साठी नगरपरिषद मोठ्या प्रमाणावर कर वाढवला आहे परंतू त्या सुविधा मिळत नाही. शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा व रत्नापूर तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरी नागरिकांना पाणीपुरवठा आठ दिवसांनी होतो. त्याचप्रमाणे शहर स्वच्छ करण्यासाठी नगरपरिषदेचे ४० कर्मचारी आहेत. परंतु आठ घंटागाडी व तीन टॅक्ट्रर आहेत परंतु शहराचा स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेने खाजगी ठेकेदार नियुक्त केला.

जामखेड नगरपरिषदेच्या वाड्या वस्त्यांसह २४ प्रभाग आहेत. त्यानुसार कचरा संकलन, ओल्या कच-यावर प्रक्रिया करणे, नालेसफाई व घनकचरा व्यवस्थापन करणे यासाठी मर्यादा येत असल्याने नगरपरिषदेने आपल्या कर्मचाऱ्याव्यतिरीक्त खाजगी ठेकेदार मागिल सहा वर्षांपासून नियुक्त केला आहे. मागील तीन वर्षांपासून आकांक्षा एन्टरप्राईज कंपनीकडे ठेका आहे. व ठेकेदाराकडे अल्प भाडेतत्त्वावर सर्व वाहने दिली आहेत.

ठेकेदाराकडे फक्त साठच्या आसपास सर्व कर्मचारी आहेत व जामखेड नगरपरिषदेचे ४० कर्मचारी यावर स्वच्छता मोहीम चालू आहे. सध्या पितृपक्ष चालू असल्याने नागरिक घरसफाई व कपडे धुणे चालू आहे त्यामुळे घरातील कचरा मोठ्या प्रमाणावर साचला आहे पण घंटागाडी वेळेवर येत नसल्याने सुका व ओला कचरा कोठे टाकावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे ठेकेदार व नगर परिषदेचे पितळ उघडे पडले आहे.

एकीकडे मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात न मिळणा-या शहरात वाढत्या धुळीचे साम्राज्यामुळे नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. शहरातील छञपती शिवाजी महाराज पेठ, नवीन पोलीस स्टेशन मार्ग, जुने कोर्ट रोड, तपणेश्वर रोड असो किंवा खर्डा रोड असो शहरात सर्वत्र धुळ आहे त्यामुळे रस्ते स्वच्छ करण्याचे ठेकेदार टाळीत असून नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले आहे.

रोगराईत वाढ, दवाखाने हाऊसफुल्ल

सध्या शहरात अस्वच्छता व बदलत्या हवामानामुळे डेंग्यूच्या डासांचे प्रमाण वाढले आहे. खाजगी व सरकारी रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत तरीही शहरात धुर फवारणी ठेकेदार अगर नगरपरिषद काहीही करताना दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here