जामखेड न्युज——
मनोज जरांगे पाटील यांच्या महासभेची जय्यत तयारी, अशी असेल वाहन पार्किंग व्यवस्था
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जामखेड येथील तहसील कार्यालया समोर दि ६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार आहे. या सभेची मराठा क्रांती मोर्चाने जय्यत तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी पाहणी केली.
मराठा आरक्षण महासभेसाठी तालुक्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येनं येणार आहे त्यांची वाहन व्यवस्था खालीलप्रमाणे आहे सर्वांनी वाहन हे दिलेल्या मोकळ्या जागेतच लावावे हि नम्र विनंती
अशी असेल वाहन पार्किंग व्यवस्था
१)खर्डा करमाळा रस्त्याने येणारे वाहन हे नागेश्वर मंदीर एच.यु.गुगळे प्लाँटिंग, नवीन नगरपरिषद या ठिकाणीच लावावेत.
२)कर्जत नगर रोडने येणारे वाहने हे जुने गोडाऊन, सेंट्रल काँम्पेक्स लाकडी वखार या ठिकाणीच लावावेत
३) बीड रोडने येणारे वाहन हे बैल बाजार, मराठी मुलांची शाळा, भक्ती शक्ती मैदान या ठिकाणीच लावावेत असे आवाहन जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे.
आज उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी महासभेच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील हे भूम येथून खर्डा येथे येणार आहेत खर्डा येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे नंतर चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन जामखेड शहरात दुपारी ३ वाजता आगमन होताच ठिक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार असुन प्रत्येक चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. सभास्थळी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना होईल.
तालुक्यातील लहान मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होईल येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय शहरातील डॉ. सुशील पन्हाळकर यांच्या तर्फे करण्यात आली आहे. या कार्यक्रमास आपल्या मतदारसंघांतील दोन्ही आमदार व खासदार आमंत्रित करण्यात आले आसले तरी एकही राजकीय भाषण त्या ठिकाणी होणार नाही अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. दि ६ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांच्या होणाऱ्या सभेस तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.