जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
परिसरातील दुर्घटना टाळण्यासाठी तसेच आळा घालण्यासाठी सर्वाना एकाच वेळी सावध करण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गाव कारभारी व अधिकारी पदाधिकारी यांच्या बैठकीत आवाहन केले.
माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक नगर यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेशित केलेले आहे.त्यानुसार आज ल.ना.होशिंग विद्यालयात ग्रामसुरक्षा यंत्रणा संचालक डी.के.गोर्डे यांनी या ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर कसा करावा तसेच कोणकोणत्या घटनामध्ये याचा उपयोग करायचा याची अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली.

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर कसा व कोणत्या घटनासाठी करायचा याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातुन चोरी, दरोडा, आग, जळीताच्या घटना, लहान मुले हरवणे, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात, वन्यप्राणी हल्ला, भुकंप व महापुर इत्यादी घटनामध्ये
ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे तातडीने मदत मिळणे व दुर्घटनांना आळा घालणे प्रभावीपणे शक्य होत आहे. तसेच आपत्तीच्या घटनामध्ये सर्व गावाला एकाच वेळी सुचना देणे, सावध करणे, अथवा मदतीला एकाचवेळी सर्वांना बोलावण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करता येणे शक्य असल्याबाबत सुचविले आहे. ग्रामसभेची माहिती देणे, घरपट्टी, पाणीपट्टी मागणी कॉल देणे, निधनवार्ता ग्रामस्थांना
कळविणे, सरकारी योजनाची माहिती देणेकरीताही याचा उपयोग होणार आहे.
ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यक्रमाकरीता तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात, तालुक्यातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील हजर होते.
ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रत्येक गावात कार्यान्वित करण्यासाठी तयारी सुरू केली असुन काही दिवसातच ही
ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रत्येक गावात कार्यान्वित होणार आहे. असा विश्वास सरपंच, ग्रामसेवक व पोलीस
पाटील यांनी तहसिलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिला आहे.