जामखेड न्युज——
सुरज मंगेश आजबे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम, जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत जामखेड येथील शंभूराजे कुस्ती संकुलचे संचालक मंगेश (दादा) आजबे यांचे चिरंजीव सुरज मंगेश आजबे याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम पटकावला आहे यामुळे त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी ल .ना .होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 48 किलो वजनी गटात खेमानंद इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी सुरज मंगेश आजबे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला यामुळे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुरज मंगेश आजबे याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. यानिमित्त खेळाडू व त्याचे प्रशिक्षक यांचे संस्थापक अध्यक्ष खासदार सदाशिवराव लोखंडे, अध्यक्ष डॉक्टर चेतन लोखंडे, ‘उपाध्यक्ष विजय पवार, सचिव सतीश शिंदे, प्राचार्य शिवानंद हलकुडे, उपप्राचार्य अमोल ढाळे व सर्व स्टाफ व मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.