जामखेड न्युज——
जामखेड मध्ये अल्पवयीन मुलीची छेड प्रकरणी दोन रोडरोमिओ विरोधात गुन्हा दाखल
मोटारसायकल वरुन अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अश्लील बोलून व पाहुन मुलीची छेड काढली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला शहरातील दोन रोडरोमिओ विरोधात विनयभंग व बालकांचे अत्याचार संरक्षण अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेण्यासाठी येतात. एस.टी. किंवा खाजगी वाहनांतून बस स्टॉपवर उतरुन शाळा कींवा कॉलेजला पायी ये जा करावी लागते. मात्र पायी प्रवास करतांना छेडछाडीच्या अनेक समस्यांचाही मुलींना मोठा सामाना करावा लागत आहे.
शहरातील आनेक रोडरोमिओ शाळा किंवा कॉलेज सुटल्यावर मोटारसायकलवय मुलींच्या पाठीमागे फीरताना दिसत आहेत. आनेक वेळा पालकांनी व नागरीकांनी या रोडरोमिओंचा पोलीसांनी बंदोबस्त करावा आशी मागणी करुनही मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सुरुच आहेत. याच अनुशंगाने दि १७ जुलै २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील झिक्री येथिल फीर्यादी व तीची मैत्रीण शाळा सुटल्या नंतर आपल्या घरी जाण्यासाठी एस बस स्थानकाकडे चालल्या होत्या. यावेळी दुपारच्या सुमारास यातील आरोपी तेजस पोकळे व सार्थक उतेकर (पुर्ण नाव माहीत नाही) या दोघांनी मोटारसायकल वरुन येत या मुलींचा पाठलाग केला. व सदर मुली एस टी बस स्थानकामध्ये आल्यावर वरील आरोपींनी अल्पवयीन मुलीस अश्लील बोलून व पाहून मुलीची व साक्षीदार यांची छेड काढली.
या प्रकरणी फिर्यादी मुलीने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आठ दिवसानंतर शहरातील दोन रोडरोमिओ विरोधात विनयभंग व बालकांचे अत्याचार संरक्षण अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस पोसई अनिलराव भारती हे करत आहेत.