जामखेड न्युज——
कै.सुभाष (आप्पा) जायभाय यांनी दिलेला समाजसेवेचा वसा पुढे घेऊन जाऊ – संदिप जायभाय
आज दि.26/जुलै कै. सुभाष (आप्पा) जायभाय यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने तेलंगशी ता.जामखेड जि.अहमदनगर येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.डॉ सुदाम महाराज पानेगावकर यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते.महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून साधु-संतांनी केलेले कार्य तसेच कै.सुभाष (आप्पा) जायभाय यांनी गोरगरीब, कष्टकरी, अनाथ, निराधार यांच्यासाठी केलेली धडपड आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मांडले.
तसेच कै.सुभाष (आप्पा) जायभाय यांनी केलेल्या कामाची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या चार मुलांनी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा जामखेड जि.अहमदनगर येथील अनाथ, निराधार, वंचित, एक पालक, दलित,आदिवासी,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,अशा 80 मुलाचे संगोपन निवारा बालगृहात लोक वर्गणीतून व लोकसभागातून केले जात आहे.या अनाथ निराधार मुलांची तळमळ जाणून जायभाय परिवाराने कै. सुभाष (आप्पा) जायभाय यांच्या प्रथम पुण्यस्मरण यानिमित्त निवारा बालगृहास तीन क्विंटल धान्य दिले.
यावेळी तेलंगशी गावातील व खर्डा जामखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पुढारी पत्रकार बांधव ह.भ.प महाराज उपस्थित होते.