संध्या सोनवणे यांच्या वतीने अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन. विद्यार्थ्यांसाठी 47 हजाराचे रोख बक्षिस

0
185

जामखेड न्युज——

संध्या सोनवणे यांच्या वतीने अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.

विद्यार्थ्यांसाठी 47 हजाराचे रोख बक्षिस

सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 18 ते 30 वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संध्या सोनवणे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विभागीय पुणे अध्यक्षा कु.संध्या सोनवणे यांच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या इस स्पर्धेत महाविद्यालयीन 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विभागीय पुणे अध्यक्षा कु.संध्या सोनवणे यांनी केले आहे.


ही निबंध स्पर्धा महाविद्यालयीन 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थ्यांना साठी घेतली जाणार असून स्पर्धेसाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी व नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि करिअरच्या वाटा व नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आव्हाने आणि संधी हे विषय देण्यात आले आहे यापैकी एका विषयावर निबंध लिहून व नाव आणि मोबाईल नंबर सह 22 जुलै पर्यंत ncpsandhyasonawane64@gmail.com. या मेल आयडीवर वर्ल्ड फाईल किंवा पीडीएफ फाईल ने पाठवावे तसेच निबंध इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत पाठवावे तसेच निबंधाची शब्द मर्यादा 2000 पर्यंत असावी व सदर निबंध स्पर्धेच्या बक्षीस विजेत्यांसाठी आकर्षक रोख प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये तर चौथे पारितोषिक ५ हजार रुपये व पाचवे पारितोषिक ३ हजार रुपये ठेवण्यात आली आहे अधिक माहितीसाठी ७८२२०९६०८० या नंबर वर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here