पल्लवी कडभनेचा श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार

0
270

जामखेड न्युज——

पल्लवी कडभनेचा श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार

साकत कडभनवाडी येथील पल्लवी कडभने हिची जळगाव येथे बीटेक करत असताना युबीएल कंपनीत निवड झाल्याबद्दल श्री साकेश्वर विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

पल्लवी कडभनेचा सत्कार करताना मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, विजय हराळे, साहेबराव कडभने, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे, चंद्रकांत लोहार हजर होते.

पल्लवे कडभने ही श्री साकेश्वर विद्यालयात २०१७ साली दहावी उत्तीर्ण झाली होती, बारावी २०१९ मध्ये प्रवरानगर तर बीटेक जळगाव येथे करत असताना शेवटच्या वर्षी काँलेजवर कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये युबीएल कंपनीत निवड झाली सुमारे सहा लाख रुपये पँकेज आहे.

पल्लवी कडभने ही एक गुणी विद्यार्थीनी होती.
तिने नववी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अंगी जर जिद्द चिकाटी व मेहणत करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते. असे सांगितले

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here