आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरी (धनेगाव) भक्तीरसात चिंब!!! मंदिर ट्रस्ट समितीच्या वतीने भाविकांचे चोख नियोजन

0
260

जामखेड न्युज——

आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरी (धनेगाव) भक्तीरसात चिंब!!!

मंदिर ट्रस्ट समितीच्या वतीने भाविकांचे चोख नियोजन

जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव या ठिकाणी भाविकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात जाऊन हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे या मंदिरात सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ व प्रा .मधुकर राळेभात यांच्या हस्ते विठ्ठलाची पुजा झाली. दिवसभर धाकटी पंढरी (धनेगाव) भक्तीरसात चिंब झाले होते. मंदिर ट्रस्ट समितीच्या वतीने भाविकांचे चोख नियोजन करण्यात आले होते.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भरत काळे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव या ठिकाणी आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात प्रत्येक एकादशीच्या दिवशी या मंदिरात कीर्तन होते. आषाढी एकादशी निमित्ताने जामखेड तालुक्यासह या ठिकाणी भुम,परांडा ,करमाळा या ठिकाणाहून देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने आले आहेत. 

जामखेड ते धनेगाव ही प्रा.मधुकर राळेभात हे देखील आपली दिंडी घेऊन येतात या वर्षीचे त्यांचे सतरावे वर्षे आहे. याच बरोबर जवळका, जेटकेवाडी, तिंत्रज, सह आनेक ठीकाणाहुन आषाढी एकादशी निमित्ताने धाकट्या पंढरीत दिंड्या येत असतात. तसेच अँड डॉ अरूण जाधव यांचीही संविधान समता दिंडी येते.

वारकर्‍यांनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पहाटे पासूनच मोठ्या रांगा लावल्या होत्या .विषेश म्हणजे सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन गायवळ यांच्या वतीने खर्डा व परीसरातील वारकर्‍यांनसाठी दर्शन घेण्यासाठी मोफत बस ची सोय करण्यात आली होती. दिवसभरात धाकट्या पंढरीत हजारो भाविकांनी दर्शन घेतले अशी माहिती माजी सरपंच भरत काळे यांनी दिली.

ग्रामस्थांच्या वतीने देखील या ठिकाणी मोफत फराळ व पाणी बॉटल वाटप करण्यात आले होते .या वेळी हजारो भाविकांनी फराळाचा लाभ घेतला .या सोहळ्यासाठी दिवसभर अनेक जण ठीक ठीकाणी फराळ व चहा पाण्याची सोय करतात. धाकटी पंढरी धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष भरत (बप्पा) काळे आहेत तर उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, सचिन काळे, सचिव बबनराव भोसले, खजिनदार संतोष काळे,
संचालक लक्ष्मण लव्हाळे,जयसिंग जाधव, बाळासाहेब टिपरे, पद्माकर काळे, उत्तम भोसले,
हिरालाल देशमुख, गणेश काळे, महादेव जाधव, बाळासाहेब पौळ, (अचारी) ,हरीभाऊ टीपरे, लक्ष्मण जाधव, रघुनाथ उंबरे, शिवाजी भोळे , शहाजी टीपरे यांनी या कार्यक्रमाचे विशेष नियोजन केले होते. तसेच या ट्रस्ट चे कायदेशीर सल्लागार म्हणून अँड अनिल काळे काम पाहतात तर मुख्य सल्लागार म्हणून प्रा. मधुकर राळेभात व सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ आहेत.
दोन दिवस संपूर्ण परिसर भक्ती रसात नाहून निघाला होता. मंदिर ट्रस्ट समितीच्या वतीने भाविकांचे चोख नियोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here