जामखेड न्युज——-
पहिल्याच पावसात नगरपरिषदेचे पितळ उघडे, अनेकांच्या दुकानात पाणी, रस्त्याला तलावाचे स्वरूप
जामखेड नगरपरिषद शाँपिंग काँम्प्लेक्सचे काम सुरू आहे. आसपास पाणी जाण्यासाठी जागाच नाही त्यामुळे नगरपरिषद परिसरात अनेकांच्या दुकानात पाणी शिरले तर रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. यामुळे दुकानदारांसोबत नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
सध्या नगरपरिषद कार्यालयासमोर शाँपिंग काँम्प्लेक्सचे काम सुरू आहे. यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे काही दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरले मोठ्या प्रमाणावर माल भिजला तसेच रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपरिषदेने गटारांची साफसफाई, कोठेही पाणी साचणार नाही याचे नियोजन करणे आवश्यक आहे पण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कोणीच लक्ष दिलेले नाही पर्यायाने व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले आहे तर रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
जामखेड शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी पुरेशी जागा नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून येणारे पाणी शिवाजीनगर परिसरात सगळे रस्त्यावर असते. पाणी जाण्यासाठी गटारे लहान व पाणी जास्त त्यामुळे रस्त्यावर पाणी येते याचे नियोजन होणे आवश्यक आहे.