ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश, मुलींचीच बाजी घोलप निकिता वाणिज्य शाखेत जिल्ह्यात दुसरी तर तालुक्यात प्रथम

0
463

जामखेड न्युज——

ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश, मुलींचीच बाजी

घोलप निकिता वाणिज्य शाखेत जिल्ह्यात दुसरी तर
तालुक्यात प्रथम

 

ल. ना. होशिंग विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश मुलींनी मारली बाजी

निकिता घोलप वाणिज्य शाखेत जिल्ह्यात द्वितीय तर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावाजलेले ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड बारावीच्या परीक्षेमध्ये उज्वल यशाची परंपरा कायम राखत बारावी वाणिज्य शाखेचा 100% निकाल बारावी कला शाखेचा 88.88% निकाल तसेच बारावी शास्त्र शाखेचा 98.37% निकाल लागला आहे तालुक्यात तसेच जिल्ह्यात विद्यालय गुणवत्ता व निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

याप्रसंगी बोलत असताना प्राचार्य श्रीकांतजी होशिंग सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने जिद्दीच्या जोरावर तसेच आई-वडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने त्यांचं भविष्य उज्वल होणारच आहे.व विद्यालय विद्यार्थ्यांच्या हित व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. विद्यालयातून कला शाखेतून प्रथम चि. जहीर मुबारक शेख 499 गुण 83.17%, द्वितीय चि. किरण आप्पा मडके 494 गुण 82.33%, तृतीय कु ऐश्वर्या जालिंदर वारे 483 गुण 80.50%,


तसेच वाणिज्य शाखेतून कु. निकिता दिनकर घोलप 521गुण 86.83%, गुण घेत तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

द्वितीय चि. अजित राजाभाऊ उतेकर 491 गुण 81.83% तृतीय कु.वैष्णवी अभिमान शिंदे ४८९गुण ८१.५०%

तसेच शास्त्र शाखेतून प्रथम कु. ज्ञानेश्वरी हनुमंत निकम 511 गुण 85.17% द्वितीय कु. आकांक्षा भीमराव गंभीरे 493 गुण 82.17% तृतीय कु. निकिता आबासाहेब वारे 488 गुण 81.33%
तर तनवी किशोर मुरूमकर 80.67 टक्के गुण घेत चौथा क्रमांक पटकावला

याप्रसंगी संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला त्याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी तसेच विविध शाखेतील प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री राजू कोहक सर श्री युवराज भोसले सर विद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीकांतजी होशिंग विद्यालयाचे उपप्राचार्य श्री पोपट जरे गुणवंत विद्यार्थी व पालक आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here