जामखेड न्युज——
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जामखेडमध्ये भव्य दिव्य मिरवणूक, महानाट्य, रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन
जामखेड शहरात शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक, महानाट्य, रक्तदान शिबीर, पोवाडे यासह विविध कार्यक्रमाचे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
जामखेड येथे प्रतिवर्षी प्रमाणे शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड तालुक्याच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले असून तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवा दरम्यान ऐतिहासिक महानाट्य, पोवाडे व महाराष्ट्र शौर्य गीतांचा कार्यक्रम, शिवराज्याभिषेक व भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असुन मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार दि. ३१ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ ०० वाजता धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे… सुवर्णक्षण महाराष्ट्राचे या ऐतिहासिक महानाट्याने सोहळ्याची सुरूवात होणार आहे. तर गुरुवार दि. १ जून २०२३ रोजी सकाळी ९ ते ५ भव्य रक्तदान शिबीर व सायंकाळी ७ वाजता झी. टी. व्ही. संगीत सम्राट फेम युवा शाहीर राम रामानंद उगले यांचा शिवदर्शन पोवाडे व महाराष्ट्र शौर्य गीतांचा कार्यक्रम, शुक्रवार दि. २ जून २०१३ रोजी पहाटे ५ वा. गडकोट किल्ले व तीर्थक्षेत्रावरील तीर्थ, सप्तनद्यांचे पवित्र जल आणि दुग्धाभिषकाने वेदमंत्रात शिवराज्याभिषेक होऊन या उत्सवाची सांगता येणार नाही. वरील तिन्ही कार्यक्रम जुने तहसिल कार्यालय जामखेड, कार्यक्रमाचे ठिकाण होणार आहेत.
भव्य मिरवणूक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शुक्रवार दि. २ जून रोजी दुपारी २:०० वाजता जामखेड येथिल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथून निघणारा भव्य मिरवणूक सोहळा. या भव्य मिरवणूकीत राम जन्मभूमी असलेल्या आयोध्येतील श्री राम मंदिर भव्य प्रकृती, २५ फुट भव्य श्रीराम मुर्ती, अश्वारूढ शिवप्रभु शंभुराजे मुर्ती, ढोल वाद्य (केरळ), लेझीम पथक (सोलापुर), पुणेरी ढोल पथक, देव मामलेदार बॅन्ड, शस्त्र पथक, हालगी पथक, नंदी पथक, मल्लखांब व रोप मल्लखांब पथक, संभळ वाद्य, गजनृत्य ही मिरवणूकीतील विशेष लक्षवेधी पथके असणार आहेत.
तरी या तीन दिवस चालणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळय़ात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.