आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून आरोळे कोविड सेंटरला होणार “एक्स – रे” सुविधा उपलब्ध

0
253
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
     जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.या रुग्णांच्या आरोग्यसाठी लागणाऱ्या वैद्यकीय साधनांची गरजेनुसार पूर्तताही करण्यात येत आहे. आ.रोहित पवार यांच्या माध्यमातुन आता या हॉस्पिटलमध्ये ‘डिजिटल एक्स-रे’ मशीन उपलब्ध करण्यात येत असुन त्यासोबतच दोन वैद्यकीय कर्मचारी हे काम पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.कर्जतसाठी देखील ‘डिजिटल एक्स- रे’ मशीन देण्यात आले असुन त्याचा वापर योग्यरीत्या सुरू आहे आता हे मशीन अधिक तास म्हणजेच आठ तास सुरू ठेवण्यासाठी आणखी एका वैद्यकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
                 
              उपचार घेणाऱ्या सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना ही सुविधा मोफत मिळणार आहे. जामखेडसाठी सुरू होणारी ही सुविधा एक महिण्यासाठी उपलब्ध असणार आहे. गरज भासल्यास या सुविधेचा कालावधी वाढवला जाणार आहे.या तपासणीत ‘निमोनिया’ तसेच ‘फुप्पूसाच्या’ असलेल्या आजारांचे याद्वारे निदान होणार आहे.अनेक रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर निमोनिया होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र लवकर निदान होऊन त्यावर उपचार करणे शक्य होणार असल्याने ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे.कोरोनाची भयावह परिस्थिती असताना रुग्णांच्या या तापसणीतूनच पुढील आवश्यक उपचार करण्यात येतात.या प्राथमिक तापसणीतच रुग्णांच्या आजाराची माहिती समजते. कोरोनाचे निदान करण्यासाठी रुग्णांना सरसकट  एच.आर.सी.टी स्कॅन तपासणीची गरज भासणार नाही.जरी ही तपासणी महत्वाची असली तरी ‘एक्स रे’ तपासणीतच आजाराचे निदान होते. त्यामुळे या सुविधेमुळे रुग्णांचा खर्च वाचणार आहे. कोरोना रुग्णांवर तात्काळ उपचार होऊन रुग्णांना बरे करण्यासाठी आ.रोहित पवार प्रयत्नशील आहेत. यासाठी लागणाऱ्या विविध अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची ते व्यवस्था करत आहेत त्यामुळे निश्चितच रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here