महापुरुषांचे विचार जीवंत ठेवण्याचे काम आनंद शिंदे यांनी केले – संध्याताई सोनवणे जामखेडमध्ये अलोट गर्दीत शिंदेशाही बाणा कार्यक्रम संपन्न

0
141

जामखेड न्युज——

महापुरुषांचे विचार जीवंत ठेवण्याचे काम आनंद शिंदे यांनी केले – संध्याताई सोनवणे

जामखेडमध्ये अलोट गर्दीत शिंदेशाही बाणा कार्यक्रम संपन्न

 

महाराष्ट्राला महापुरुषांच्या विचारांची खुप मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आणि जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान समाज कधीच विसरणार नाही. या महापुरुषांचे विचार जीवंत ठेवण्याचे काम आनंद शिंदे यांनी केले असे मत साऊ फाऊंडेशनच्या अध्यक्षा आयोजक संध्याताई सोनवणे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती निमित्त ‘शिंदेशाही बाणा’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे यांनी केले होते यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राणीताई लंके, प्रा. मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव, सलीम बागवान, भाजपातालुकाध्यक्ष अजय काशिद, तापकीर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे, नगरसेवक पवन राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, सुनील साळवे, ऋषिकेश मोरे, उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा, संतोष निसर्गगुंदे, नगरसेवक मोहन पवार, विनोद आखाडे, गणेश डोंगरे, संतोष गव्हाळे, युवराज उगले, राहुल उगले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती निमित्त ‘शिंदेशाही बाणा’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांसह प्रेषक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद शिंदे हे मोठे सुप्रसिद्ध गायक आहेत
महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. संगीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्रातील एक सांगितीक घराणे ज्याला लोकसंगीतचा असाच वारसा लाभला आहे, या घराण्याच्या तब्बल पाच पिढ्या गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या घराण्याने कव्वाली, पारंपरिक गाणी, भारुड, गोंधळ, प्रेम गीते इत्यादी गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली असे ‘शिंदे घराणे’. प्रल्हाद शिंदेपासून सुरु झालेला हा संगीत प्रवास आल्हाद शिंदे म्हणजेच त्यांच्या पणतूपर्यंत सुरु आहे. संगीत क्षेत्रामध्ये अशी घराणी दुर्मिळच असतात ज्यांना पाच पिढ्यांचा वारसा लाभतो. ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमामधून जामखेड करांना संगीताची मेजवानी मिळाली

संध्याताई सोनवणे या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महिला व विद्यार्थ्यांनीसाठी आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात असंख्य महिला व विद्यार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच नाथ महोत्सवात नायगाव येथे सुरेखा पुणेकर यांच्या लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

संध्याताई सोनवणे यांचाही वाढदिवस असल्याने त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कोल्हे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here