मिलिंद शिंदे यांच्या भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात संपन्न

0
142

जामखेड न्युज——

मिलिंद शिंदे यांच्या भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात संपन्न

जामखेड शहरात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त समाजमंदिर बाजारतळ येथे सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती व समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांचा भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी केले होते.

सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांचे आगमन झाले. याप्रसंगी भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात व भाजपाचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच मिलिंद शिंदे यांचा सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष राजन समिंदर , उपाध्यक्ष रवी सोनवणे, सचिव रजनीकांत मेघडंबर, सल्लागार सिध्दार्थ साळवे, डाॅ.सचिन घायतडक, सचिन सदाफुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रांतीकारी जलसा कार्यक्रमात तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, विस्तार अधिकारी बापूराव माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा.मधुकर राळेभात,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपूते, जिल्हा सोसायटी अहमदनगर संचालिका ज्योती पवार,निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे, मधुकर महानूर, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, व्यापारी रमेश जरे, संचालक सागर सदाफुले, जामखेड कर्मचारी कृती समितिचे अध्यक्ष युवराज पाटील, विकास राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, सुरेखा सदाफुले, सुरेखा सदाफुले, सुनिल जावळे, बौध्दाचार्य गोकुळ गायकवाड, सचिन सदाफुले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, विनोद सोनवणे , प्रताप पवार, नितीन वाव्हळ,बापूसाहेब गायकवाड, मुकूंद घायतडक, प्रकाश काळे, रजनीकांत साखरे, जयदिप शिंदे, प्रा.राहुल आहिरे, माजी सरपंच भरत आहेर, शिवाजी ससाणे, विनोद घायतडक सह भिमजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, माहिला, बाळगोपाळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीचे पदाधिकाऱ्यांसह भिमसैनिकांनी परिश्रम घेतले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here