जामखेड न्युज——
पैठण पंढरपूर पालखी मार्गाचे अपुर्ण अवस्थेतील काम तसेच पुलांचे काम पूर्ण करावे
अपुर्ण कामामुळे धुळीचा त्रास व अपघातात वाढ
नागरिकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा
पैठण पंढरपूर पालखी मार्गावरील दिघोळ ते खर्डा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आल्याने नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
जातेगाव ,दिघोळ ,माळेवाडी, मोहरी ,तेलंगशी, जायभायवाडी , धामणगाव, देवदैठण, नाहुली या भागातील शेतकरी हजारो लिटर दूध, तरकरी, शेतीमाल घेऊन खर्डा या ठिकाणी जातात. परंतु रस्ता खराब असल्यामुळे दुधासह शेतीमालाची नासाडी होते. दिघोळ जातेगाव वरून वाहन चालक पदचारी यांनाही या रस्त्याने नकोसे वाटते. दिंडीतील वारकरी तर दिंडी सोडून डोंगराने पायवाट आपली करतात.त्यामुळे पहिलाच रस्ता बरा म्हणण्याची वेळ वाहन चालक व प्रवाशावर आली आहे.
२०१५ ते २०१९ ला हे काम जलद गतिने सुरू होते त्यानंतर या कामाची गती मंदावत गेली हे काम कधी चालू तर कधी बंद अवस्थेत असते. गेल्यातीन वर्षापासून हे काम पूर्ण बंद अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली. ना ठेकेदार ना अधिकारी ना आमदार ना खासदार कोणालाच याचे देणे घेणे नसल्याचे कामाच्या दिरंगाईमुळे दिसून येते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. मध्यंतरी वन विभाग व काही शेतकऱ्यांनी रस्ता आडवा आडवीचे प्रकार केले होते. यावर तोडगा काढून संबंधित ठेकेदाराला पोलीस संरक्षणात रस्त्याचे काम सुरू करण्यास परवानगी दिली गेल्याचे कळते. परंतु ठेकेदाराचा अनुउत्साह दिसून आला.
दिघोळ ते खर्डा रस्त्यावरील सर्व पुलांचे कामे अपूर्ण अवस्थेत आहे. फुलावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना अक्षरशा कसरत करावी लागते. अनेक वेळा खड्ड्यात पडण्याचे प्रकारही घडले आहेत. पावसाळ्यात तर रस्त्यावर वाहन चालक घसरून पडतात. हा रस्ता खराब असल्यामुळे रस्त्यावर आडवा आडवीचे प्रकारही घडतात. अनेक वेळा अधिकारी, आमदार, खासदार, यांच्याकडे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता हे काम लवकर सुरू न झाल्यास जातेगाव, दिघोळ, माळेवाडी, मोहरी, जायभायवाडी, तेलंगशी,या भागातील सरपंच उपसरपंच वाहन चालक, प्रवासी, व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासूनपैठण पंढरपूर पालखी मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असूनयाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो खराब रस्ता असल्यामुळेया परिसरातआरोग्य केंद्र नसल्यामुळे या भागातील रुग्ण, गरोदर महिला यांना तात्काळ उपचारासाठी खर्डा किंवा जामखेड येथे पोहोचणे जरुरीचे असताना खराब रस्त्यामुळे पोहोचण्यास उशीर होत असल्यामुळे अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण? ठेकेदाराने पावसाळ्या पूर्वी काम सुरू करून पूर्ण करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
दिपाली पांडुरंग गर्जे मा सरपंच जातेगाव
गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी पासून पैठण ते पंढरपूर रस्त्याचे काम चालू आहे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेशंट, विद्यार्थी, नागरिक ,महिला यांना धुळीचा त्रास होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे .रस्त्याचे अपूर्ण कामामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर संबंधित ठेकेदाराकडून काम चालू करून पूर्ण करून घ्यावे अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल.
मच्छिंद्र गहीनाथ गिते गणप्रमुख भाजपा साकत गण