जामखेड न्युज——
वक्तृत्वाला कर्तृत्व, व्यासन, चारित्र्य, वाचन याची जोड हवी – गिरीश कुलकर्णी
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नगरचा अनिकेत ढमाले प्रथम तर मुंबईचा यश पाटील द्वितीय, तर नाशिकची श्रुती बोरस्ते तृतीय
वक्तृत्व कला खुप महत्त्वाची आहे. यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. वक्तृत्वाला कर्तृत्व, व्यासन, चारित्र्य, वाचन याची जोड असेल तर आपण जीवनात यशस्वी होणारच यासाठी सातत्यपूर्ण व्यासंग हवा, ऐकण्याची सवय हवी यामुळे नवे मुद्दे समजतील स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे बक्षीस मिळो अथवा न मिळो असे मत स्नेहालय संस्थेचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालय जामखेड आणी ल.ना.होशिंग
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. सैनिक कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे उद्घाटक आदर्श शिक्षक श्री. मनोहर इनामदार (गवसणीकार) (जि.प.प्राथ. शाळा दत्तवाडी, धोंडपारगाव) यांच्या हस्ते करण्यात आले होते तर समारोप स्नेहालय संस्थेचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, संचालक अशोक शिंगवी, शरद देशमुख, एस. एम खान, विठ्ठल रेडे, अरूणराव देशमुख, प्राचार्य डॉ. एम एल.डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्रा. अविनाश फलके, योगेश अब्दुले, मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपमुख्याध्यापक रमेश अडसुळ, लक्ष्मीकांत देशमुख, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, अशोक वीर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले की,
त्याग,नैतिकता कर्तुत्व महत्त्वाचे आहे. हे गुण अंगी असतील तर संपूर्ण जग डोक्यावर घेते. दि पिपल्स एज्युकेशन संस्थेचे काम निस्वार्थ भावनेचे आहे म्हणून परिसरात नावलौकिक आहे.
स्पर्धेत पुढील स्पर्धकांनी पारितोषिके मिळवली
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकुण ३२ स्पर्धक सहभागी झाले होते.
प्रथम – ५००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
विजेते न्यु आर्ट्स सायन्स कॉलेज अहमदनगर येथील ढमाले अनिकेत प्रल्हाद
द्वितीय ३००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
विजेते बिर्ला काँलेज मुंबई येथील पाटील यश रविंद्र
तृतीय २००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
विजेते नाशिक येथील बोरस्ते श्रुती अशोक
उत्तेजनार्थ १००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
विजेते प्रवरा मेडिकल ट्रस्ट शेवगाव येथील पायधन रामेश्वर सावळेराम
उत्तेजनार्थ १००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
विजेते ल. ना. होशिंग कनिष्ठ महाविद्यालयची सुरवसे निकिता यांनी बक्षिसे पटकावली
प्रा. नामदेव म्हस्के निकाल वाचन केले.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी परिक्षक कोल्हे सर, तनपुरे सर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे, प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी तर आभार अविनाश फलके यांनी मानले.
स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे होते.
१. मी नव्या युगाचा / युगाची मतदार.
२. आधुनिक शेती व आव्हाने.
३. आजचे शिक्षण रोजगाराभिमुख आहे का ?
४. राष्ट्र निर्माणासाठी युवकांची भुमिका.
५. कोरोनाने आम्हाला काय दिले ?
६. भारतीय कुटुंबसंस्था – संस्कार केंद्र.
७. समान नागरी कायदा – अपेक्षा आणि वास्तव.
८. स्टार्ट-अप आणि विद्यार्थी.
९. उर्जास्त्रोत – समस्या व उपाय योजना.
१०. स्त्रियांना आरक्षण मिळाले… संरक्षणाचे काय ?
११. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी-मतदार नोंदणी