कडभनवाडी येथे शाँटसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान

0
263

जामखेड न्युज——

कडभनवाडी येथे शाँटसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान

तालुक्यातील साकत परिसरातील कडभनवाडी येथील कडभने व नेमाने यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर मध्ये शाँटसर्किट झाल्याने आग लागली या आगीत तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे यामुळे कडभने व नेमाने यांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत तीन एकर ऊस जळून गेला.

कडभनवाडी येथील शहादेव कडभने, मच्छिंद्र कडभने, अरूण नेमाने, जालिंदर नेमाने यांच्या शेतात विजेचा ट्रान्सफॉर्मर आहे व शेजारी ऊसाचे क्षेत्र आहे आज बुधवार दि. ८ रोजी दुपारी अचानक ट्रान्सफॉर्मर मध्ये शाँटसर्किट झाल्याने सुमारे तीन एकर ऊस जळून खाक झाला यात सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करावा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

शेतात दोन ट्रान्सफॉर्मर शेजारी शेजारी आहेत. दुपारी अचानक शाँटसर्किट झाले. यामुळे लाखो रूपयांचा ऊस जळून खाक झाला आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी लाईटच्या तारांना झोळ पडलेले आहेत. अनेक ठिकाणी पोल वाकलेले आहेत. यामुळे अशा घटना घडतात. तरी प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करावा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here