—अखेर माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना तीन महिन्यानंतर अटक चार दिवसांची पोलीस कस्टडी

0
293
  • जामखेड न्युज——

  • —अखेर माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना तीन महिन्यानंतर अटक

  • चार दिवसांची पोलीस कस्टडी

  • जामखेड येथील व्यापारी अंदुरे कुटुंबावर केलेल्या हल्ला प्रकरणातील जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना अखेर तीन महिन्यानंतर अटक करण्यात यश आले आहे.
    आज जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. या प्रकरणातील आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.
  • पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांच्या सह त्यांच्या इतर सहा आरोपींवर व्यापारी अंदुरे कुटुंबियांवर हल्ला प्रकरणी तीन महिन्यांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता तेव्हा पासून माजी सभापती सह इतर आरोपी फरार होते. यानंतर या घटनेतील आरोपी विक्रम भगवान डाडर, सोनू बबन वाघमारे, सागर सतिश डिसले, अमोल किसन आजबे, सागर बापुराव टकले अशा पाच आरोपींना यापुर्वी अटक केली होती तर डॉ भगवान मुरूमकर व भरत पांडुरंग जगदाळे हे आरोपी फरार होते.
  • यानंतर जामखेड पोलीसांना डॉ भगवान मुरूमकर हे बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस काँन्टेबल आबासाहेब आवारे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संग्राम जाधव, पो. काँ. राऊत, आजबे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना आज दि. २८ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली.

  • आज जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ३१ जानेवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. या घटनेतील आरोपी भरत पांडुरंग जगदाळे अद्याप फरार आहे. या घटनेचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड करत आहेत.
  • चौकट

  • डॉ भगवान मुरूमकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

  • माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना दि. २६ जानेवारी रोजी रात्री जामखेड पोलीसांनी ताब्यात घेतले होते. पण त्यांच्या साथीदारांनी पोलीसांशी हुज्जत घालत व झटापट करत खर्डा परिसरातून आरोपीला घेऊन गेले होते. त्यामुळे डॉ भगवान मुरूमकर यांच्या वर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणखी गुन्हा दाखल झाला आहे यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here