जामखेड न्युज—–
ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये विश्व हिंदी दिवस संपन्न झाला.
10 जानेवारी 2023 रोजी ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी विभागातर्फे विश्व हिंदी दिवस अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. या विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने हिंदी विभागातर्फे काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ सर उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग उपस्थित होते,तसेच पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे सर हे देखील उपस्थित होते.काव्यवाचन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश अडसूळ यांनी विश्व हिंदी दिवस याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व त्यानंतर हे 35 सहभागी विद्यार्थ्यांनी सुंदर असे काव्य वाचन केले.या कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी काव्यवाचनाची केलेली तयारी याबद्दल विद्यार्थ्यांचे प्रथमता विशेष कौतुक करून आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी दिवस याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

हिंदी विभागाचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हिंदी विभागातील शिक्षक श्री साई भोसले श्रीमती संगीता दराडे मॅडम श्रीमती सुप्रिया घायतडक,श्रीमती प्रभा रासकर,श्री किशोर कुलकर्णी सर सर्वांनी सहकार्य केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद उगले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पोपट जगदाळे सर यांनी केले.




