जामखेड न्युज—–
नागेबाबा पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम
जामखेड शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या सामाजिक जाणिवेतून पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. नगरमध्ये अँडमिट असलेल्या रूग्णांना मोफत डबे पुरवले जातात तर बरोबर असलेल्या सोबत्याला विचारांचे पुस्तक भेट दिले जाते. याचबरोबर नागेबाबा सुरक्षाकवच, नागेबाबा वृक्षमित्र तसेच लवकरात लवकर खरेदी साठी स्मार्ट
कार्ड दिले जाणार आहे. या विविध सामाजिक उपक्रमामुळे लोकांमध्ये पतसंस्थेबाबत आपुलकीची भावना निर्माण होत आहे.
नागेबाबा पतसंस्थेच्या माध्यमातून जे रूग्ण नगरला अँडमिट आहेत त्यांना पतसंस्थेच्या माध्यमातून मोफत डबे पुरवले जातात. नगर मध्ये सात मेस वाले यांच्या बरोबर संस्थेने करार केला आहे. मोफत डब्ब्यामुळे अनेक रूग्णांचा फायदा झाला आहे. तसेच रूग्णांबरोबर असलेल्या सोबत्याला विचाराचे पुस्तक दिले जाते.
पतसंस्थेच्या माध्यमातून नागेबाबा सुरक्षाकवच योजनेचा अनेक रूग्णांना फायदा झाला आहे.
आतापर्यंत बारा लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला आहे.
याचबरोबर संस्थेने नागेबाबा वृक्षमित्र योजना सुरू केली आहे याद्वारे खातेदारांने प्रत्येक महिन्याला झाडाबरोबर फोटो पाठवणे सध्या जामखेड तालुक्यात तीस लोक अपडेट आहेत.
नागेबाबा संस्थेच्या माध्यमातून उद्योजक घडविण्यासाठी मदत केली जाते
संस्थेच्या माध्यमातून लवकरात लवकर स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहेत.नामांकित दुकाने हाॅटेल यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे.
सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी
शाखाधिकारी वैभव तांबे, अमोल जठाडे, अशोक कापसे, हरिदास नन्नवरे हे काम करत आहेत.