जामखेड न्युज——
पत्रकारांच्या अदृश्य शक्ती मुळेच जामखेड तालुका रोजगार हमी योजनेत प्रथम – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

स्वातंत्र्य पूर्व काळापासून पत्रकार समाज जागृतीचे काम करत आहे. आजही ते काम पत्रकार चोखपणे बजावतात शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत व जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यत पोहचविण्याचे काम पत्रकार करतात पत्रकारांच्या अदृश्य शक्ती मुळेच जामखेड तालुका रोजगार हमी योजनेत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे असे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मत व्यक्त केले.

जामखेड पंचायत समितीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती बेल्हेकर, विस्तार अधिकारी बापुराव माने, भजनावळे, मिसाळ यांच्या सह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, सचिव सत्तार शेख, दत्तात्रय राऊत, फायकअली सय्यद, अविनाश बोधले, संजय वारभोग, किरण रेडे, पप्पूभाई सय्यद, रोहित राजगुरू, अजय अवसरे, संतोष गर्जे
मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दिपक देवमाने, ओंकार दळवी, लियाकत शेख, प्रकाश खंडागळे, सुजीत धनवे

खर्डा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे, दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे, किशोर दुशी, गायकवाड
जामखेड तालुका पत्रकार संघाचे अशोक निमोणकर, मिठुलाल नवलाखा, बाळासाहेब वराट, यासीन शेख, समीर शेख, किरण शिंदे यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोळ म्हणाले की, प्रशासनात काम करताना पत्रकाराचे महत्त्व खुप मोठे आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पत्रकारांच्या माध्यमातून जातात. त्यामुळे आम्ही त्या प्रभावीपणे राबवितो. औषध कडू असते पण त्यामुळे आजार बरा होतो तसेच शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात ते औषधाप्रमाणे कडू वाटतात पण यामुळे तळागाळातील लोकांना फायदा होतो. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे.
यावेळी बोलताना जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट म्हणाले की, जामखेडचे पत्रकार हे काळाबरोबर बदलणारे पत्रकार आहेत. येथील पत्रकारांनी डिजिटल मिडिया मध्ये चांगल्या प्रकारे काम सुरू केले आहे. चांगल्या कामाला प्रसिद्धी व चुकीच्या कामाबद्दल ताशेरे ओढण्याचे काम पत्रकार प्रभावीपणे करत असतो असे सांगितले.
महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी अविनाश बोधले, बाळासाहेब शिंदे, प्रकाश खंडागळे, संजय वारभोग, लियाकत शेख, बाळासाहेब वराट यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी तर आभार बापुराव माने यांनी मानले.





