जामखेड न्यूज—–
कांदा उत्पादकांसाठी खुशखबर खर्डा येथे खरेदी केंद्र सुरू, जास्तीच्या दरामुळे शेतकरी खुश
आता कांदा विक्री साठी सोलापूरला जाण्याची गरज नाही.
खर्डा येथे कांदा खरेदी केंद्र सुरू झाल्याने जास्तीचा दर मिळत असल्याने कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद.
याबाबत माहिती अशी की, खर्डा येथील विलास खिवंसरा आणि कंपनी यांचे नावाजलेले भुसार मालाचे आडत दुकान आहे, या फार्मचे अडत व्यापारी कांतीलाल खिवंसरा व राहुल बेदमुथा यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेऊन नुकतेच कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे. तसेच जास्तीचा दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे. मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी आलेल्या कांद्याला जाहीर लिलावातून जास्तीचा दर मिळू लागला आहे.
खर्डा परिसरात व जवळच असणारा मराठवाडा या भागात कांदा उत्पादक शेतकरी हे जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी सोलापूर नगर किंवा इतर ठिकाणी जावे लागत होते, त्यामुळे वाहतूक खर्च ही वाढत होता त्यातच कांद्याला कधी कधी दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत होता,या सर्व बाबींचा विचार करून खर्डा येथे कांदा खरेदी केंद्र सुरू झाल्याने खर्डा मार्केट मध्ये होणाऱ्या जाहीर लिलावात शेतकऱ्यांना जास्तीचा पैसा हातात पडू लागला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी खर्डा येथे घेऊन येत असल्याने खर्डा येथील मार्केट यार्डात गर्दी फुल लागली आहे. कांद्याचे लिलाव हे दर रविवार मंगळवार आणि गुरुवार या तीन दिवशी होत असतात या कांदा खरेदी केंद्रामुळे खर्डा येथील 40 ते 50 महिला व मजुरांच्या हाताला काम मिळाले असल्याने त्यांचाही आर्थिक स्तर उंचावत आहे.
खर्डा येथे कांदा खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा लांबचा वाहतूक खर्च वाचत असून या ठिकाणी कांद्याला प्रतवारीनुसार चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे.