आमदार रोहित पवारांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड जामखेडमध्ये फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

0
189

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

जामखेडमध्ये फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी
आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटच्या राजकारणात उडी घेतली आहे. आज त्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, राजेंद्र कोठारी, महेश राळेभात, नगरसेवक मोहन पवार, राजेंद्र पवार, अमोल गिरमे, उमर कुरेशी, इस्माईल सय्यद, जुबेर शेख, बिलाल शेख, प्रशांत राळेभात, महेंद्र राळेभात, राहुल अहिरे, तात्या मुरूमकर पाटील, निखिल घायतडक, राजेंद्र गोरे, विकी उगले, गणेश वारे यांच्या सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. रोहित पवार क्लब गटातून विजयी झाले असून ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य बनले आहेत. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर १६ सदस्यीय कमिटीची आज (रविवारी) दुपारी एक बैठक पार पडली. याच बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. रोहित पवार यांच्याविरोधात कोणीही अर्ज भरला नाही, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची निवड झाली. त्यामुळे आजोबा शरद पवारांनंतर आता रोहित पवारांचीही आता क्रिकेटच्या मैदानात दमदार एन्ट्री झाली आहे.

यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे म्हणाले की, आमदार रोहित पवारांच्या निवडीमुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे म्हणाले की, आमदार रोहित पवारांनी विकास कामामुळे देशात आपला ठसा उमटविला आहे. आता क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक करून देशपातळीवर कर्जत जामखेड ओळखले जाईल.

यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले की, आमदार रोहित पवार हे आपले आजोबा शरदचंद्र पवार साहेबांप्रमाणे आपल्या कर्तृत्वाने आपला ठसा देशात उमठवतील व कर्जत जामखेडचे नाव देशात होईल.

यावेळी उमर कुरेशी म्हणाले की, आमदार रोहित पवारांच्या निवडीमुळे कर्जत जामखेड मधील एखादा तारा क्रिकेट मध्ये निश्चितच चमकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here