पत्रकार हा शासन व जनता यामधील दुवा आहे- समीर पठाण समीरभाई पठाण मित्रमंडळ व पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

0
162

जामखेड न्युज——

पत्रकार हा शासन व जनता यामधील दुवा आहे- समीर पठाण

समीरभाई पठाण मित्रमंडळ व पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

लोकशाहीत पत्रकार अत्यंत महत्वाचा घटक आहे. लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोच करण्याचे काम खऱ्या अर्थाने पत्रकार करत असल्याने पत्रकार हा शासन व जनता यामधील दुवा आहे. तो वर्षभर आपले काम इनामे इतबारे करत असतो असे मत पाटोद्याचे माजी सरपंच समीरभाई पठाण यांनी व्यक्त केले.

भाषणाच्या बाबतीत मुलुक मैदानी तोफ म्हणून समजल्या जाणाऱ्या समीरभाई पठाण मित्रमंडळ व पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, सचिव सत्तार शेख, दत्तात्रय राऊत,
मिठुलाल नवलाखा, लियाकत शेख, ओंकार दळवी, अशोक वीर, अविनाश बोधले, प्रकाश खंडागळे, अशोक वीर, समीर शेख, धनराज पवार, पप्पूभाई सय्यद, रोहित राजगुरू, सुजीत धनवे, यासीन शेख सह समीर पठाण माजी सरपंच, अनिल थोरात, सदाभाऊ कवादे, भाऊसाहेब शिंदे, पंडीत मोरे, अक्षय आमटे, इस्माइल पठाण, गोकुळ महारनवर, मुज्जाहिद्द पठाण, सादीक पठाण, अण्णा कात्रजकर, प्रकाश शिंदे सह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना समीरभाई पठाण म्हणाले की, पत्रकारांमुळे समाजातील नागरीकांच्या अनेक समस्या शासन दरबारी जातात व त्या सुटतात पत्रकारांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे असे पठाण यांनी सांगितले.

यावेळी सर्वच पत्रकारांनी आपले विचार व्यक्त केले व समीरभाई पठाण यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here