जामखेड न्युज——
शिष्यवृत्ती परीक्षेत लटकेवस्ती शाळेचे घवघवीत यश
जिल्हा व राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत चमकले विद्यार्थी
तालुक्यातील शिऊर येथील लटकेवस्ती शाळेने शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा गुणवत्ता तसेच राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत घवघवीत यश संपादन केले आहे त्यामुळे यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जुलै 2022 मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती (शिऊर)चा विद्यार्थी चि.श्रीकांत राजेंद्र लटके याने 300 पैकी 276 गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावला. तसेच चि.उज्वल संतोष लगड याने 300 पैकी 270 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 9 वा क्रमांक,चि.विराज भागवत फाळके याने 300 पैकी 266 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 15 वा क्रमांक, कुमारी साक्षी भागवत निकम हिने याने 300 पैकी 266 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 17 वा क्रमांक,चि. प्रणव विश्वंभर उतेकर याने 300 पैकी 262 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 27वा क्रमांक मिळविला. त्यांना वर्गशिक्षिका श्रीमती अनिता विठ्ठल पवार मॅडम व श्रीमती रसिका महालिंग गाढवे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम आण्णा उतेकर, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, केंद्रप्रमुख किसन वराट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ लटके, उपाध्यक्ष रामचंद्र लटके शिक्षणप्रेमी नागरिक अमोल काळे ,राजेंद्र लटके, दादा लटके, सरपंच सौ गिरिजा उतेकर, उपसरपंच सौ प्रियंका तनपुरे, ग्रामपंचायत सदस्य सौ राजश्री लटके, सौ उषा निकम, बदाम निंबाळकर व नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.