जामखेड न्युज——
जामखेड बुडाले अंधारात नागरिक त्रस्त
महावितरणचे अधिकारी नाँट रिचेबल
महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. जामखेड परिसरात मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. जामखेड तालुक्यातील अनेक भागात हेच चित्रं सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल होताना दिसत असून अजून दोन दिवस काढायचे कसे? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.
जामखेड शहरात मध्यरात्री पासूनच वीज गुल झाली आहे.थंडीचे दिवस असल्याने पंखे, कुलरची गरज नसली तरी पाण्याच्या मोटारी, मोबाईल चार्जिंग व शेतकऱ्यांना शेतीच्या तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाले आहे. सरकारने विजेच्या संदर्भात झालेला प्रश्न लवकरच मिटवावा अशी मागणी होत आहे.
आज मध्यरात्रीपासून राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शेतकरी व सामन्य ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणने संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे. ४,५ व ६ जानेवारी २०२३ असा तीन दिवस हा संप असणार आहे.
मध्यरात्री पासून ७२ तासांचा हा संप केला जाणार असून यामध्ये राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहे.दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.