सावित्रीबाई फुले यांच्या मुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला – मुख्याध्यापक दत्ता काळे श्री साकेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
211

जामखेड न्युज——

सावित्रीबाई फुले यांच्या मुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला – मुख्याध्यापक दत्ता काळे 

श्री साकेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अज्ञात, अंधश्रद्धा होती तसेच मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम केले यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला महिलांना सन्मान मिळाला असे मत मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी व्यक्त केले.


श्री साकेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिक्षिका सुलभा लवुळ तर विद्यार्थी छाया वराट, समृद्धी मुरूमकर, सिद्धी मुरूमकर, अंजली लहाने, ईश्वरी सानप, अक्षरा मुरूमकर, विजया मुरूमकर, सिद्धी मुरूमकर, ऋतुजा घोलप, पल्लवी नेमाने, अनुराधा मोहिते, सई जावळे, ओम वराट, सार्थक मुरूमकर, हरिश्चंद्र अडसुळ यांनी भाषणे केली तर सातवीतील विद्यार्थ्यीनीनी गीत गाईले. 

यावेळी बोलताना शिक्षिका सुलभा लवुळ म्हणाल्या की, सावित्रीबाई यांनी क्रूर रूढींनाही आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनां शिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. सावित्रीबाई फुले यांच्या मुळे स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लक्ष्मी वराट यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here