विविध सामाजिक उपक्रमांनी आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपात संचारला उत्साह, हजारो गरजूंना भाजपकडून मदतीचा हात

0
122

जामखेड न्युज——

विविध सामाजिक उपक्रमांनी आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपात संचारला उत्साह, हजारो गरजूंना भाजपकडून मदतीचा हात

कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांकडून आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मतदारसंघातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमामुळे मतदारसंघातील 3000 विद्यार्थ्यांना वह्या, पॅड आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच 1000 हजार गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

भाजपा कार्यकर्त्यांकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे गेल्या तीन चार दिवसांपासून मतदारसंघात आयोजन करण्यात आले. नववर्षाच्या पुर्वसंध्येपासूनच आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस मतदारसंघात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यास सुरुवात झाली. मतदारसंघातील विविध गावांमध्ये आमदार राम शिंदे यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांसह सामान्य जनता एकवटल्याचे चित्र गेल्या चार दिवसांपासून निर्माण झाले आहे. आमदार राम शिंदे यांच्या झंझावाती दौर्‍याने गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे.

आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांकडून शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. कार्यकर्त्यांकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या,पॅड, शैक्षणिक साहित्य, तसेच एक हजार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 500 गरजू कुटुंबांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. तसेच 500 गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले होते.

आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील विद्यार्थी आणि गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक दायित्वाचा अनोखा संदेश दिला.आमदार राम शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेले सर्व सामाजिक उपक्रम स्व खर्चातून राबविण्यात आले होते. गावोगावी कार्यकर्ते विविध उपक्रम घेत असल्याचे दिसून आले. यामुळे मतदारसंघातून राजकीय वातावरण भाजपमधील झाल्याचे स्पष्ट चित्र सध्या निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here