जामखेड न्युज——
तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत मोठ्या गटात जिल्हा परिषद देवदैठण शाळेचा प्रथम क्रमांक
दिंडी नृत्य – विठू रायाची नगरी” गीत सादरीकरण

जामखेड पंचायत समिती मार्फत आयोजित २६ डिसेंबर रोजी ल.ना. होशिंग विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद देवदैठण शाळेने “दिंडी नृत्य – विठू रायाची नगरी” या गाण्यावर मनमोहक नृत्य सादर करून तालुक्यात मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला यामुळे या चिमुकल्यावर व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सादर केलेल्या दिंडी नृत्य – विठू रायाची नगरी या गीतात देवदैठण जिल्हा परिषद शाळेतील ५ ते ८ चे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कृष्णा भोरे, कृष्णा चिलगर, रोहन भोरे, सुजित भोरे, मयूर सलगर, आयुष अस्वार, पांडुरंग तोरांबे, तन्मय भोरे, सिद्धी भोरे, सृष्टी गुरव, तनुजा उगले, कल्याणी भोरे, प्रतिभा महारनवर, प्राजंल भोरे, निता भोरे, अमृता रोडके यांनी सहभाग घेतला होता.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवदैठण केंद्र तेलंगशी या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख मुकुंद सातपुते, मुख्याध्यापक आनंद राऊत, श्रीमती कविता गुजर, अंबादास गाडे, सचिन पवार, विवेक गर्जे, मनोज दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, केंद्रप्रमुख मुकुंद सातपुते, सरपंच, उपसरपंच, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.


