जामखेड न्युज——
पर्यावरणाचा संदेश देत जामखेडचा सायकलपटू समीर शेख निघाला दिल्लीला
जामखेडचा तरुण समीर शेख हा दरवर्षी एक जानेवारीला जामखेड हुन लांब पल्याचे सायकल प्रवास करत असतो जनजागृती अभियानाअंतर्गत , दैनंदिन जीवनात आरोग्याचे महत्त्व व पर्यावरण संरक्षणाची आजची गरज या विषयावर सायकल प्रवासादरम्यान शाळा – कॉलेज मध्ये जाऊन आपले मत मांडून जनजागृती करण्याचे कार्य करत असतो.
समीर शेख हा तरुण गेल्या तीन वर्षांपासून ह्या अभियानाअंतर्गत सायकल प्रवास करत आहे, सायकलिंग करणे हे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदाई आहे आणि रोज सायकलिंग केल्याने आपला आयुर्मान वाढण्यास मदत होते तसेच बऱ्याच आजारापासून आपण वाचतो हे संदेश देत तो आपला प्रवास पूर्ण करणार आहे
तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, तो जामखेड ते दिल्ली 1670 किमी चा प्रवास तब्बल 9 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजित केले आहे साधारणपणे रोज 180 ते 200 किमी सायकल प्रवास करत जामखेड ते पाटोदा, बीड, गेवराई, पाचोडा, औरंगाबाद, वेरूळ, कन्नड, चाळीसगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, खलघात, धार, रतलाम, जावरा, चितोडगड, भिलवाडा, अजमेर, किशनगड, जयपूर, गुरुग्राम, दिल्ली ( हजरत निजामोद्दीन) मार्गे सायकल प्रवास करणार आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा व दिल्ली असे राज्यातून हा सायकल प्रवास होणार आहे. समीर शेख यांच्या सायकल प्रवासात त्यांचे सहकारी मित्र जुबेर काझी हे त्यांच्या मदतीस आसणार आहेत. तसेच त्याचे संपर्क नंबर 808 77 808 41 असे आहे. जामखेड मधून या तरुणाचे सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात आहे