-
जामखेड न्युज——
-
एमआयडीसीमुळे कर्जत-जामखेडच्या विकासाला चालना मिळेल – उद्योजक आकाश बाफना
-
आमदार रोहित पवारांनी कर्जत-जामखेडसाठी एमआयडीसी आणल्याबद्दल नागरिकांच्या वतीने जाहीर आभार

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जामखेड-कर्जत तालुक्यासाठी औद्योगिक वसाहत क्षेत्र अखेर मंजूर झाले. यामुळे जामखेड- कर्जतच्या विकासात खूप मोठी भर पडणार आहे. नवयुवक,सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुणांना भविष्यात पुणे, मुंबई व इत्यादी शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. औद्योगिक वसाहतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल व जामखेड- कर्जतचे राहणीमान उंचावेल व विशेष महत्त्व प्राप्त होईल सदरील वसाहतीसाठी आमदार रोहित दादा पवार यांनी सतत पाठपुरावा करून यश संपादन केले यामुळे आदरणीय रोहित दादांचे जामखेड -कर्जत वासियांकडून हार्दिक आभार -आकाश दिलीप बाफना ( मॅनेजिंग डायरेक्टर- बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

आमदार रोहित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात 23 डिसेंबर 2022 रोजीच्या विधीमंडळाच्या कामकाजातील लक्षविधी सूचनेद्वारे सरकारचे याकडे लक्ष वेधले आणि हा मुद्दा उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या निवेदनात कर्जत येथील पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली व कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव व खंडाळा येथील 458.72 हेक्टर क्षेत्रास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असून औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल तसेच सदर औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूकदारांनी भूखंडाची मागणी केल्यास पास थ्रू पद्धतीने भूखंड उपलब्ध करून देण्याची तजविज ठेवलेली आहे. असे विधीमंडळाच्या पटलासमोर निवेदनाद्वारे जाहीर केले. त्यामुळे लवकरच कर्जत तालुक्यातील खंडाळा व पाटेगाव येथे औद्योगिक क्षेत्र विकसित होईल व परिसरातील बेरोजगार युवकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
ज्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी नाही अशा मतदारसंघांपैकी कर्जत-जामखेड मतदारसंघात इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात एमआयडीसी दिली जात आहे. एमआयडीसी येणारच हा आत्मविश्वास आमदार रोहित पवार यांना असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून वेळोवेळी पाठपुरावा करून नगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच श्रीगोंदा ते जामखेड हा देखील महामार्ग रोहित पवार यांनी मंजूर करून आणले आहेत. आणी आता एमआयडीसी आणल्यामुळे मतदारसंघातील सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळण्यासाठी होणार आहे यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न मार्गी लागेल असे उद्योजक आकाश बाफना यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले. यामुळे आमदार रोहित पवारांचे मतदारसंघाच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले आहेत.




