जामखेड न्युज——
जागा वाटपावरून वारे – मोरे समझोता एक्सप्रेसमध्ये ठिणगी
सुर्यकांत मोरे यांच्या भुमीकेकडे तालुक्याचे लक्ष
रत्नापूर ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे व माजी सभापती सुर्यकांत मोरे यांचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जागा वाटपावरून एकमत झाले नसल्याने सुर्यकांत मोरे यांनी आपल्या गटाचे सरपंच पदाच्या उमेदवारासह वार्ड क्रमांक दोन व तीन मधील सर्वच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे माजी सभापती डॉ सुर्यकांत (नाना) मोरे हे या निवडणूकीत काय भूमिका घेतात याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

रत्नापूर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या बाबत पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की रत्नापूर ग्रामपंचायतीची एकुण मतदार संख्या ही २१०० एवढी आहे. सरपंचपद हे जनतेतुन आहे. या ग्रामपंचायती मध्ये एकुण तीन वार्ड आहेत. एकुण दहा जागांसाठी या निवडणूकीची लढत आहे.
पुढे बोलताना सुर्यकांत (नाना) मोरे म्हणाले की सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस चा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे हे देखील रत्नापूर गावचे आसल्याने गावपातळीवर एकच पॅनल करायची माझी भुमिका होती. या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचे पक्षाचे स्वरूप द्यावयचे नव्हते व तशी माझी भुमिका नव्हती. या निवडणुकीत वार्ड क्रमांक एक, दोन आणि तीन मध्ये मधिल उमेदवारी अर्ज मला माझ्या कार्यकर्त्यांनी विचारुन भरले होते. तर काही उमेदवारी अर्ज दत्तात्रय वारे यांनी देखील भरले होते. तर काही जणांनी आम्हाला विचारुन देखील उमेदवारी अर्ज भरले नव्हते.

उमेदवारी अर्ज भरताना मात्र सरपंच पदासाठी मी सुचवलेले नाव या बाबत एकमत झाले नाही. वार्ड क्रमांक एक मध्ये एकमत झाले असले तरी वार्ड क्रमांक दोन व तीन मधिल जागावाटपात एकमत झाले नसल्याने या जागांचा तिढा सुटला नाही. वार्ड क्रमांक दोन व तीन मधिल सहा जागांपैकी तीन तीन जागा वाटुन घ्याव्यात आसे देखील मी सुचवीले होते माञ तसे झाले नाही शेवटी मी दोन व तुम्ही चार जागा घ्या आसे देखील दत्तात्रय वारे यांच्या गटाला सुचवीले मात्र तसेही वारे यांना मान्य झाले नाही तसा माझा प्रस्ताव त्यांनी स्विकारला नाही.
शेवटी त्यामुळे मी माझ्या गटाच्या राजगुरू रतन गोरख, सरपंच पदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याच बरोबर सदस्य पदासाठी नितीन वैजीनाथ बुचुडे, उद्धव आबासाहेब ढवळे, वारे कानिफ मच्छीन्द्र, वारे आनंत महेंद्र, दत्तात्रय अंकुश मोरे, मोरे मंदाकिनी दत्तात्रय, मोरे नानासाहेब रावसाहेब, रुपाली नितीन बुचुटे, मोरे ज्योती नानासाहेब व सुप्रिया सुजित नलवडे या उमेदवारांनी आपल्या पदाचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत सध्या या रत्नापूर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत समोरासमोर दोन पॅनल उभे आहेत. सध्या रत्नापूर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची राजकीय परीस्थिती अडचणीची बनली असुन माजी सभापती सुर्यकांत मोरे आता काय निर्णायक भुमिका घेणार याकडे सर्वच तालुक्याचे लक्ष लागले आहे.




