Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या पद्मविभूषण मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शिबिराचे...

पद्मविभूषण मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शिबिराचे बारामतीत आयोजन १२ जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक घेऊ शकतात लाभ

0
216

जामखेड न्युज——

पद्मविभूषण मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शिबिराचे बारामतीत आयोजन
१२ जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक घेऊ शकतात लाभ

१२ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ; राज्यभरातील नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेण्याचे आ. रोहित पवारांचे आवाहन

१२ जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक घेऊ शकतात लाभ

बारामती | खासदार शरदचंद्रजी पवार साहेब तसेच प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून व गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रमेश भोईटे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले योजना तसेच अनंत आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी, ऍन्जिओग्राफी व बायपास सर्जरीचे आयोजन बारामती येथे करण्यात आले आहे. त्यानुसार १२ नोव्हेंबर ते १२ जानेवारी असे दोन महिने संपूर्ण राज्यभरातील नागरिक या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील गरजू नागरिकांनी संपर्क करून उपचार घ्यावे.

१२ नोव्हेंबर रोजी शिबिर सुरू झाल्यापासून शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. येत्या काळात आणखी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे. मागील वर्षी आयोजित केलेल्या शिबिराला नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर नागरिकांच्या मागणीनुसार शिबिराचा कालावधी 1 महिन्याने वाढवण्यात देखील आला होता.

मागच्या 5 वर्षात या शिबिरांतर्गत 3 हजार 145 नागरिकांच्या ऍन्जिओग्राफी करण्यात आल्या आहेत. तसेच 1182 अँजिओप्लास्टी, 455 बायपास तर 156 हार्ट सर्जरी करण्यात आल्या आहेत. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक नोंदणी करून या शिबिरात सहभागी होऊ शकतात. गिरिराज हॉस्पिटल, एसटी स्टँडनजीक इंदापूर रोड, बारामती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नाव नोंदणीसाठी व मदतीसाठी 9696330330 या‌ हेल्पलाईन क्रमांकावर नागरिक संपर्क साधू शकतात. जास्तीत जास्त नाव नोंदणी करून नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा व शिबिराचा लाभ घ्यावा.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
1. पूर्व तपासणीचा रिपोर्ट व औषधे
2. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
3. आधार कार्ड व मतदान कार्ड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!