जामखेड न्युज——
चित्रकलेतून जीवन घडविता येते – रमेश गुगळे!!
गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्री साकेश्वर विद्यालयात चित्रकला परीक्षा संपन्न!!
चित्रकला हा दुर्लक्षित विषय नसून त्यात अनेकांनी आपले करिअर घडविले आहे. अनेकांनी देशातच नव्हे तर परदेशात जाऊन आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांनी या क्षेत्रात आपले करिअर करावे असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे यांनी विद्यार्थ्यांना केले.
एच. यु.गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्री साकेश्वर विद्यालयात चित्रकला परीक्षा संपन्न झाली या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव मुरूमकर, प्रसिद्ध उद्योगपती रमेश भाऊ गुगळे, समृद्धी उद्योग समूहाचे वैभव कुलकर्णी, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, अतुल दळवी, अण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गुगळे म्हणाले की, ग्रामीण भागातील वातावरण एकदम चांगले आहे निसर्गाच्या सानिध्यात राहावयास मिळते शहरातील मुले सिमेंटच्या जंगलात राहतात. त्यामुळे त्यांना निसर्गाचा सहवास लाभत नाही.
चित्रकला स्पर्धा २००३ ला सुरू होऊन हे १९ वे वर्ष आहे. या चित्रकला स्पर्धा सातत्याने अतिशय व्यवस्थित सुरू आहेत. या स्पर्धा द्वितीय सत्रामध्ये संपूर्ण दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेतील सर्व शाखा ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड, श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव, श्री साकेश्वर विद्यालय साकत, श्री इंग्लिश स्कूल विद्यालय राजुरी स्पर्धा घेण्यात येतात. या चारही शाखेतील सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. साकेश्वर विद्यालयात १७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
चारही शाखांमधून इयत्ता पाचवी ते सातवी इयत्ता आठवी ते दहावी दोन गटांमध्ये स्पर्धा घेतली जाते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट जामखेड वतीने देण्यात येते. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेची संधी मिळते त्याबद्दल श्री रमेशशेठ गुगळे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी ज्ञानदेव मुरूमकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की, गुगळे परिवाराने सुरू केलेला उपक्रम खुपच छान आहे. यामुळे अनेक चित्रकार घडले.
यावेळी ज्ञानेश्वरी मुरूमकर हिने पंचायत समिती मार्फत झालेल्या चित्रकला स्पर्धेत विशेष नैपुण्य मिळवल्या बद्दल तिचा सन्मान करण्यात आला.
प्रस्ताविक त्रिंबक लोळगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा वराट व ज्ञानेश्वरी मुरूमकर यांनी केले तर आभार सुदाम वराट यांनी मानले