जामखेड न्युज——
भरदिवसा घरफोडी अडिच लाखांचा ऐवज लंपास देवदैठण व नाहुली नंतर महिन्यात दुसरी घटना
जामखेड तालुक्यातील तेलंगशी या ठिकाणी भरदिवसा घरफोडी झाली आहे. या घरफोडी मध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. तालुक्यात अनेक दिवसांपासून भरदिवसा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

या प्रकरणी फिर्यादी शहाजी बिभीषण जाधव. वय 28 वर्ष धंदा शेती रा. तेलंगशी ता. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडुन मिळालेली माहिती अशी की दि 14 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास तेलंगशी गावातील जाधव वस्ती या ठीकाणी फीर्यादी हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरामधील कपाटाची व सामानाची उचकापाचक केली व कपाटातील रोख दोन लाख रुपये व पंचेचाळीस हजार रुपयांचे दागिने असा एकुण 2 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने खर्डा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सापोनी बढे हे करत आहेत.

या पुर्वी देखील जामखेड तालुक्यातील महिन्यापुर्वी देवदैठण, नाहुली तसेच पिंपरखेड सह तीन महीन्यापुर्वी पिंपळवाडी, कोल्हेवाडी व कडभनवाडी परीसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर कोल्हेवाडी मध्ये देखील भरदिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यातच काल पुन्हा तेलंगशी येथे भरदिवसा घरफोडी झाल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांन कडुन होत आहे.






