जामखेड न्युज——
चुकीचा इतिहास दाखवून मावळ्यांची बदनामी करणाऱ्या हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद करावेत -संभाजी ब्रिगेड
छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवून मावळ्यांची बदनामी करणाऱ्या हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद करावेत म्हणून संभाजी ब्रिगेडने पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
संभाजी ब्रिगेड नगर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हर हर महादेव या चित्रपटात महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा व सरदारांचा चुकीचा इतिहास दाखवून प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदनामी केली आहे.
इतिहासाची मोडतोड करुन विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. त्यामुळे सदर चित्रपटाचे संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यातील चित्रपटगृहात दाखवण्यात येणारे शो आज पासुन दाखविण्यात येऊ नये, यदाकदाचित शो बंद करण्यात आले नाही, तर संभाजी बिग्रेड सामाजिक संघटन व इतर जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी संघटनांमार्फत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस व निर्माण होणाऱ्या कायद्या व सुव्यवस्थेस सर्वस्व जबाबदारी ही थिएटर मालक व पोलीस प्रशासन यांची राहील असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मोरे, सदस्य श्रीकांत धोत्रे, पोपटराव चेमटे, प्रताप शिंदे, कैलास वाघस्कर, राहुल अळकुटेअळकुटे यांच्या सह्या आहेत. निवेदन थिएटर चालकांना दिले आहे.
चौकट
जामखेड येथील गोरोबा कुंभार चित्रमंदिर यांनी स्वतः होऊन हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद ठेवले आहेत तस पत्रही गोरोबा कुंभार चित्रमंदिराचे मालक विनायक राऊत यांनी संभाजी ब्रिगेड यांना दिले आहे.